वाशीम : आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरीता ग्रामीण भागातील ‘दुर्गा’ची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 09:26 AM2017-12-13T09:26:47+5:302017-12-13T09:32:54+5:30

ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड झाली आहे.

Washim: 'Durga' in rural areas for inter-city archery competition | वाशीम : आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरीता ग्रामीण भागातील ‘दुर्गा’ची निवड

वाशीम : आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरीता ग्रामीण भागातील ‘दुर्गा’ची निवड

googlenewsNext
ठळक मुद्देदुर्गा शिरपूर जैन येथील गवळी महाविद्यालयाची विद्यार्थीनीमहाविद्यालयाच्यावतिने दुर्गाचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशीम): ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे.
स्थानिक पुंडलीकराव  गवळी कला व विज्ञान महाविद्यालय येथे बि.ए.भाग  अंतीम वर्षाची विद्यार्थीनी  दुर्गा सखाराम लांडकर ही आंतर  महाविद्यालयीनस्तरीय  महिला गट तिरंदाजी  स्पर्धेमध्ये उत्तम निशाणा साधुन  यशस्वी झाली. कलिंगा इन्स्टिट्युट आॅफ इंडिस्ट्रयल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर ओरीसा येथे होणाºया अखिल भारतीय आंतर विद्यापिठ स्तरीय तिरंदाजी स्पर्धेकरिता तिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाकडून निवड करण्यात आली आहे. अनेक खडतर परिश्रमातुन हे यश तिच्या पदरी पडले. बोरगाव या लहानशा  गावातुन आलेल्या विद्यार्थीनीने यशस्वी झेप घेतल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या अध्यक्षा  खासदार भावनाताई गवळी, संस्था सचिव अशोकराव महाजन यांनी सदर विद्यार्थीनीचे  कौतुक करुन सत्कार केला.  आपल्या यशाचे श्रेय ती प्राचार्य डॉ.एस.डब्ल्यु.खाडे व मार्गदर्शक प्रा.श्रीकांत कलाने यांना देत आहे.

Web Title: Washim: 'Durga' in rural areas for inter-city archery competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.