Washim District should be declared drought-affected: NCP's demand | वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

ठळक मुद्देसन २०१७-१८ करीता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली. निकषात बदल असल्याचे कारण समोर करून अद्याप वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही. येत्या १०-१५ दिवसाच्या आत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास  आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिला.

वाशिम : वाशिम जिल्हयाची पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याने शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन सोयीसवलतीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

गतवर्षी वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात सातत्य नसल्याने मूग, उडीद, सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली. प्रकल्पांतदेखील पुरेशा प्रमाणात जलसाठा नसल्याने शेतकºयांना सिंचन करता आले नाही. आताही रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची बिकट अवस्था असून, शासनाने शेतकºयांना दिलासा देणे अपेक्षीत आहे.   सन २०१७-१८ करीता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली. मात्र, निकषात बदल असल्याचे कारण समोर करून अद्याप वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला नाही. हा एकप्रकारे शेतकरी व शेतकरी पुत्रांवर अन्याय असल्याचा आरोप करीत वाशिम जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी शासनाकडे केली. 

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला नसल्याने शासनाकडून मिळणाºया सवलतींपासून शेतकºयांना तुर्तास तरी वंचित राहावे लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांना वीज देयकात सुट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सुट, शेतसारा भरण्याला सुट यासह अन्य सवलती मिळतात. शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी राकाँच्यावतीने करण्यात आली. खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे असतानाही, दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषणा करण्याला विलंब लागत आहे. येत्या १०-१५ दिवसाच्या आत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास  आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिला.