एन.एस.यू.आय.ची वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:25 PM2018-08-10T12:25:37+5:302018-08-10T12:26:26+5:30

वाशिम - स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत एन.एस.यू.आय.ची (नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया) जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, यावेळी अमरावती विद्यापीठ उपकेंद्रासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Washim District Executive declared by NSUI | एन.एस.यू.आय.ची वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित 

एन.एस.यू.आय.ची वाशिम जिल्हा कार्यकारिणी घोषित 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत एन.एस.यू.आय.ची (नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया) जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, यावेळी अमरावती विद्यापीठ उपकेंद्रासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अमित झनक होते. यावेळी रिसोड, मालेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव शिंदे, कारंजा, मानोरा विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष राज चौधरी यांची उपस्थिती होती. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून अक्षय वानखेडे यांची निवड झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी गठीत होणे बाकी होते. आमदार अमित झनक यांच्या नेतृत्त्वात या कार्यकारिणीतील काही पदाधिकाºयांची निवड जाहिर करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ओम शेळके, जिल्हा सचिव म्हणून योगेश्वर वानखेडे, कारंजा तालुकाध्यक्षपदी अक्षय बनसोड, कारंजा शहराध्यक्षपदी पुष्पक पाचडे, रिसोड तालुकाध्यक्षपदी अजय संजय चव्हाण, रिसोड तालुका उपाध्यक्षपदी विकास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाºयांचे आमदार झनक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटन वाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र वाशिम येथे लवकरात लवकर व्हावे यासाठी एनएसयुआयच्या पदाधिकाºयांनी अमित झनक यांच्याशी चर्चा  केली. विद्यापीठ उपकेंद्रासाठी एनएसयुआयच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रिसोड, मालेगाव विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या संघटन वाढीसंदर्भात बाबुराव शिंदे यांनी आमदारांशी चर्चा केली.

Web Title: Washim District Executive declared by NSUI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.