वाशिम शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 04:40 PM2019-07-19T16:40:33+5:302019-07-19T16:40:38+5:30

जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील दोन दुकाने फोडली तर दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले.

In Washim city Theft in four shops at one night | वाशिम शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली

वाशिम शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अलिकडच्या काळात जिल्हत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, १८ जुलैच्या रात्रीदरम्यान जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील दोन दुकाने फोडली तर दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले. या घटनेत जवळपास १.४० लाखांचा ऐवज लंपास केला असून, व्यापाºयांसह शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे.
शहर पोलीस स्टेशनपासून केवळ पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या व मुख्य चौकांपैकी एक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या कंकाळ कॉम्प्लेक्समधील एक दुकाने फोडले असून, दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरट्यांना यश आले नाही. अक्षदा किडस रेडीमेड ड्रेसेस, रौनक फर्निचर या दोन दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शटर उघडले नसल्याने येथे चोरी होउ शकली नाही. या दुकानाच्या बाजुच्या पतंजलीचे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल््यातील अंदाजे ८५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. रिसोड रोडवरील श्री सुपर शॉपी हे दुकानही चोरट्यांनी फोडले. ड्राय फूड, रोख व अन्य साहित्य असा ५२ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री दोन दुकाने फोडल्याने तसेच दोन दुकानात चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केल्यामुळे शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष मोहिम हाती घेतली आहे. १० दिवसांपूर्वी चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यातही पोलीस यंत्रणेला यश आले. दुसरीकडे चोरीच्या घटनाही वाढल्या असल्याचे दिसून येते. गत आठवड्यात चोरीच्या १० पेक्षा अधिक घटना घडल्याने चोरट्यांनी एकप्रकारे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण केले आहे.

Web Title: In Washim city Theft in four shops at one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.