वाशिम : भाजपाने केला गुजरात, हिमाचल विजयाचा जल्लोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 08:13 PM2017-12-18T20:13:11+5:302017-12-18T20:18:19+5:30

वाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून साजरा करण्यात आला.

Washim: BJP made Gujarat, Himachal wins the victory! | वाशिम : भाजपाने केला गुजरात, हिमाचल विजयाचा जल्लोष!

वाशिम : भाजपाने केला गुजरात, हिमाचल विजयाचा जल्लोष!

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी चौकात ढोलताशाचा गजर फटाके फोडून केला आनंद साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद वाशिम जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून साजरा करण्यात आला.
गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात मतदारांनी भाजपाला कौल दिल्यामुळे भाजपाला दुहेरी सत्ता मिळाली. या विजयाचा आनंद भाजपा शहर व तालुका शाखा तसेच भाजयुमोच्या वतीने जल्लोष करुन साजरा करण्यात आला.  यावेळी भाजपा पदाधिकार्‍यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हारार्पण करुन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सर्वाना पेढे वाटण्यात आले. यावेळी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार लखन मलीक, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, अनुसुचीत जाती प्रदेश चिटणीस नितेश मलीक, अपंग आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल कुळकर्णी, न.प. सभापती राहुल तुपसांडे, निलेश जैस्वाल, सुनिल तापडीया, संतोष तोंडे, मिठुलाल शर्मा, भिम जिवनाणी, नगरसेविका करुणाताई कल्ले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. उषा वानखेडे, नगरसेवक गौतम सोनोने, प्रभाकर पद्मणे, भाजयुमो शहर अध्यक्ष पवन जोगदंड, जीवन अग्रवाल, कपिल सारडा, रमेश मुंदडा, धनाजी सारसकर, आशुतोष राऊत, रोहित चांदवाणी, लक्ष्मीकांत चिपडे, कैलास मुगवानकर, सचिन शर्मा, गणेश खंडाळकर, जयेश आंबटपुरे, प्रल्हाद गोरे, गणेश जगताप, मनिष मंत्री यांच्यासह शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Washim: BJP made Gujarat, Himachal wins the victory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.