VIDEO : वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पातील पाण्याला सुटली दुर्गंधी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 07:45 PM2018-04-22T19:45:01+5:302018-04-22T19:45:01+5:30

सोनल प्रकल्पावरुन पाणीपुरवठा केल्या जाणा-या वनोजा, दुबळवेल आणि किन्हीराजा येथे योजनेच्या ‘हेडवर्क’जवळून पाणी ७० फुट मागे सरकल्याने सद्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.

VIDEO: Sonal project in Washim district News | VIDEO : वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पातील पाण्याला सुटली दुर्गंधी! 

VIDEO : वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पातील पाण्याला सुटली दुर्गंधी! 

Next

वाशिम - सोनल प्रकल्पावरुन पाणीपुरवठा केल्या जाणा-या वनोजा, दुबळवेल आणि किन्हीराजा येथे योजनेच्या ‘हेडवर्क’जवळून पाणी ७० फुट मागे सरकल्याने सद्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. गत काही दिवसांत प्रकल्पाच्या पाणीपातळीत मोठी घसरण झाली असून प्रकल्पातील पाण्याचा रंग पिवळसर झाला आहे. तसेच पाण्यातून दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकल्पातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नये, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात आले आहे.

मालेगाव तालुक्यातील सोनाळा येथील मध्यम प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणा-या सोनल प्रकल्पात सद्या मृत जलसाठा शिल्लक आहे. त्यातही झपाट्याने घट होत असून दुबळवेल, वनोजा पाणीपुरवठ्याच्या ‘हेडवर्क’पासून ७० फुट पाणी मागे सरकले आहे. ‘हेडवर्क’मध्ये पाणी घेण्यासाठी एकाच पंपाचा वापर सुरू असल्यने पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. प्रकल्पातून पाणी उपसा करण्यासाठी काही मोटारपंप तसेच इतर साहित्य खरेदीसाठी जिल्हाधिका-यांकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर केल्याचे जीवन प्राधिकरणने सांगितले. सोबतच प्रकल्पातील पाण्याचा रंगही पिवळसर झाला असून हे पाणी आता पिण्यायोग्य आहे अथवा नाही, हे तपासून पाहणे गरजेचे झाले आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता रामदास मुंढे यांनी दिली

Web Title: VIDEO: Sonal project in Washim district News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.