जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम  जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:56 PM2018-03-08T14:56:39+5:302018-03-08T14:56:39+5:30

वाशिम - जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध ठिकाणी ८ मार्च रोजी कार्यक्रम घेण्यात आले. 

Various programs in the Washim district on the occasion of World Women's Day | जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम  जिल्ह्यात विविध कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम  जिल्ह्यात विविध कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय क्रीडा स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाºया महिलांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या दालनात करण्यात आला.श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत संस्थाध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनात महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. 

वाशिम - जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध ठिकाणी ८ मार्च रोजी कार्यक्रम घेण्यात आले. 

विभागीय क्रीडा स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाºया महिलांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या दालनात करण्यात आला. वाशिमच्या महिलांनी विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने हा सत्कार घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ज्योती गणेशपूरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिल्पा इंगळे, वंदना इंगळे, हर्षदा खंबायतकर, कल्पना हागे, वैशाली देवगिरीकर, शिला हागे, मनिषा कालापाड, मनिषा चौधरी आदी महिलांचा  मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या महिलांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविताना हर्षदा देशमुख, प्रमोद कापडे यांनी विभागस्तरीय स्पर्धेत वाशिमच्या महिलांनी बजावलेली चमकदार कामगिरी ही भूषणावह बाब आहे, असे गौरवोदगार काढले. रिठद येथील दिव्यदृष्टी इंग्लीश स्कूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक रामदास गायकवाड यांनी केले. यावेळी विद्यार्थिनींनी कवितेच्या माध्यमातून स्त्री शक्तीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. चिंचाबापेन येथे भारत माध्यमिक शाळेत दी आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. शिवाजी शिक्षण संस्था वाशिमअंतर्गत येणाºया श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत संस्थाध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनात महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. 

Web Title: Various programs in the Washim district on the occasion of World Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.