महाशिवरात्रीनिमित्त तामकराड येथे विविध कार्यक्रम ; महाप्रसादाचे होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:05 PM2018-02-12T14:05:33+5:302018-02-12T14:06:57+5:30

मालेगाव - महाशिवरात्रीनिमित्त मालेगाव तालुक्यातील श्री ऋषी महाराज संस्थान तामकराड येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

Various programs at Tamakrad for Mahashivaratri | महाशिवरात्रीनिमित्त तामकराड येथे विविध कार्यक्रम ; महाप्रसादाचे होणार वितरण

महाशिवरात्रीनिमित्त तामकराड येथे विविध कार्यक्रम ; महाप्रसादाचे होणार वितरण

Next
ठळक मुद्देमहाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.महाशिवरात्रीला १८ क्विंटल उसळीचे वाटप करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण होणार आहे.

मालेगाव - महाशिवरात्रीनिमित्त मालेगाव तालुक्यातील श्री ऋषी महाराज संस्थान तामकराड येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. महाशिवरात्रीला १८ क्विंटल उसळीचे वाटप करण्यात येणार आहे तर १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे वितरण होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन प.पू. बबन महाराज यांनी केले आहे.
तामकराड संस्थानवर  महाशिवरात्री उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संस्थान परिसरात कमानी उभारने, मंदिराचे रंगकाम , आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामे पूर्ण झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी रोज रात्री ८.३० ते १० वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाचे वितरण १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत केले जाणार आहे. पर्वत कडेला हे संस्थान आहे. श्री चंदनशेष महाराजांच्या वास्तव्याने सदर ठिकाण पावन झाले आहे. येथे दर सोमवारी नागपंचमीला  भाविक  मोठ्या संख्येने दर्शनास येतात. मेडशी ते मुंगळा या रस्त्यावरील रेगाव येथून तामकराड येथील संस्थानवर जाता येते. डोंगरकिन्ही येथूनही तामकराड संस्थानवर जाता येते. संस्थानवर आयोजित विविध कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन प.पू. बबन महाराज यांनी केले आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातील चांडस येथील श्री चंद्रेश्वर संस्थानवरदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रिला येथे भाविक मोठया संख्येने दर्शनास येतात. महशिवरात्रीला येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. गर्भगृहामध्ये श्री चंद्रेश्वरांचे शिवलिंग आहे. मंदिराचे बांधकाम दक्षिण भारतीय पध्दतीचे आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. त्यामध्ये शिववाहन नंदीची मुर्ती आहे. सभामंडपात श्री रामदेव बाबांची मूर्ती आहे . मंदिर परिसरात श्री कृष्ण मंदिर  आहे. मंदिरालगत बाराही महिने पाणी असलेली बारव (विहीर) आहे. तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तत्कालीन आमदार विजयराव जाधव यांच्या स्थानिक विकास निधीमधून १० लाख रुपये अंदाजित खर्चाचा सभामंडप  येथे बांधण्यात आला आहे. मालेगाव- मेहकर राज्यमहामार्गावर मालेगावपासून १० किमी अंतरावर हे संस्थान आहे.

Web Title: Various programs at Tamakrad for Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.