हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:16 PM2018-07-20T13:16:19+5:302018-07-20T13:17:41+5:30

वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही हजयात्रेला जाणाºया जिल्ह्यातील हजयात्रेकरूंसाठी २१ जुलै रोजी लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Vaccination camp at Washim for Haj pilgrims | हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर

हज यात्रेकरूंसाठी वाशिम येथे लसीकरण शिबिर

Next
ठळक मुद्देहुजेफा नगर येथील तवक्कल फंक्शन हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान हे कार्यक्रम पार पडणार आहेत. हज प्रशिक्षण तथा लसीकरण शिबिरात मेनिंजायटिस, एन्फ्लूएंझाची लस, तसेच पोलिओचे डोज दिले जाणार आहेत.जिल्हा प्रशिक्षक अल्हाज जावेद अली फारुखी, हज प्रशिक्षक प्रा. हाजी गफ्फार गाजी आणि हाजी आरिफ भोगानी हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देतील.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही हजयात्रेला जाणाºया जिल्ह्यातील हजयात्रेकरूंसाठी २१ जुलै रोजी लसीकरण व हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक हुजेफा नगर येथील तवक्कल फंक्शन हॉलमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान हे कार्यक्रम पार पडणार आहेत. 
वाशिम येथे आयोजित हज प्रशिक्षण तथा लसीकरण शिबिरात मेनिंजायटिस, एन्फ्लूएंझाची लस, तसेच पोलिओचे डोज दिले जाणार आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा प्रशिक्षक अल्हाज जावेद अली फारुखी, हज प्रशिक्षक प्रा. हाजी गफ्फार गाजी आणि हाजी आरिफ भोगानी हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देतील. त्यानंतर लसीकरण शिबिर पार पडणार आहेत. हज कमिटी आॅफ इंडिया आणि टूरमार्फत जाणाºया हजयात्रेकरूंना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा हज प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे लसीकरण इंन्चार्ज जावेद अली फारूखी आणि वाशिम जिल्हा हज प्रशिक्षक प्रा. गफ्फार गाजी यांनी केले आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातून यंदा हज कमिटी इंडियामार्फत जाणाºया १६५, तर टूरच्या माध्यमातून हजयात्रेला जाणाºया २९ यात्रेकरूंना विशेष मेनिंजायटिस, एन्फ्लूएंझा लस आणि पोलिओ लसीकरण शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते आरोग्य व प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या शिबिरात लसीकरण करण्याची जबाबदारी शासकीय रुग्णालयाच्या पथकाकडे सोपविण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अल्हाज जावेद अली फारूखी, वाशिमचे प्रशिक्षक प्रा. गफ्फार गाजी, हाजी मोहम्मद एजाज, मंगरूळपीरचे डॉ. जमील, कारंजा लाडचे हाजी मोहम्मद आरिफ भोगानी यांची प्रमुखता उपस्थिती राहील. हज प्रशिक्षणात सहभागी होणाºया सर्व हजयात्रेकरूंना स्वत:सोबत रक्तगट कार्ड, पासपोर्टच्या सत्य प्रतीलिपी, तसेच आरोग्य प्रशिक्षणासाठी ठरवून दिलेल्या आकारातील छायाचित्र सोबत आणण्याचे आवाहन जिल्हा हज प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे लसीकरण इन्चार्ज जावेद अली फारूखी यांनी केले आहे.

Web Title: Vaccination camp at Washim for Haj pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम