नागपूर-औरंगाबाद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:51 PM2017-11-17T14:51:16+5:302017-11-17T14:51:54+5:30

कारंजा लाड: तालुक्यातून जाणाºया नागपूर-औरंगाबाद या दुतग्रती मार्गावर अपघाताची मालिका मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. गुरुवार १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर पुन्हा याच मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वरास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यृ झाला. 

Two wheeler rider killed in unknown vehicle on Nagpur-Aurangabad road | नागपूर-औरंगाबाद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

नागपूर-औरंगाबाद मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

Next
ठळक मुद्दे कारंजा तालुक्यातील घटना  

कारंजा लाड: तालुक्यातून जाणाºया नागपूर-औरंगाबाद या दुतग्रती मार्गावर अपघाताची मालिका मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. गुरुवार १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर पुन्हा याच मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वरास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यृ झाला. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ नोव्हेंबर रोजी मध्य रात्रीनंतर एम एच-३७, एस-६२४५ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रणजीत किसन राठोड (३५) रा शेवती यांचा जागीच मृत्यृ झाला. ही घटना नागपूर-औरगांबाद महामार्गावरील राज हॉटेल समोर घडली. या प्रकरणी फिर्यादी भिकाजी राठोड रा शेवती यांच्या फिर्यादीवरून कारंजा ग्रामीण पोलीसानी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे.  

Web Title: Two wheeler rider killed in unknown vehicle on Nagpur-Aurangabad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात