पीकविम्यासाठी दोन दिवसाची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 04:28 PM2019-07-22T16:28:22+5:302019-07-22T16:28:27+5:30

पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, पात्र शेतकºयांना २४ जुलैपूर्वी पिकाचा विमा उतरविणे बंधनकारक आहे.

Two day period for crop insurance | पीकविम्यासाठी दोन दिवसाची मुदत

पीकविम्यासाठी दोन दिवसाची मुदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यावर्षी मान्सून लांबल्याने आणि त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने पिकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे. पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, पात्र शेतकºयांना २४ जुलैपूर्वी पिकाचा विमा उतरविणे बंधनकारक आहे.
यावर्षी विपरित हवामान असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मान्सून लांबल्याने पेरण्या विलंबाने झाल्या आहेत. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने पिकांची भयावह परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई दिली जाते.  सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी अद्याप पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला नाही.  यामुळे या शेतकºयांना पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. २४ जुलैपर्यंत पीक विम्याचे प्रस्ताव स्विकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील नऊ पिकांना विमा संरक्षण मिळणार असून विम्याचे प्रस्ताव बँकेबरोबरच सामुहिक सुविधा केंद्रातही स्विकारले जात आहेत. कर्जदार शेतकाºयांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी वाशिम जिल्ह्याकरिता भारतीय विमा कंपनीची नेमणूक झाली आहे. या विमा कंपनीने जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक तालुकास्तरावर आपले प्रतिनिधी नेमलेआहेत. 
सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री पिक विमा विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.  तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाºया शेतकºयांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकºयांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

Web Title: Two day period for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.