दोन दुचाकीची समोरासमोर धडक; तीन जण जखमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:36 PM2018-09-25T16:36:29+5:302018-09-25T16:36:40+5:30

उंबर्डाबाजार : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना कारंजा लाड ते दारव्हा मार्गावरील दादगाव फाटयानजीक २५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

Two bikes hit face to face; Three people injured! | दोन दुचाकीची समोरासमोर धडक; तीन जण जखमी !

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; तीन जण जखमी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डाबाजार : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना कारंजा लाड ते दारव्हा मार्गावरील दादगाव फाटयानजीक २५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
कारंजा तालुक्यातील मनभा येथील विकेश भोयर व कुलदीप खोलगडे हे आपल्या एम.एच.३७ व्ही -७४९३ क्रमांकाच्या मोटारसायकलने मनभा येथून कारंजाकडे जात होते तर विरुध्द दिशेने येणाºया कारंजा लाड येथील एम.एच.३० एम.४८८ क्रमांकाच्या मोटारसायकलने एक इसम येत होता. दरम्यान दारव्हा मार्गावरील दादगाव फाट्यानजीक या दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने विवेक भोयर, कुलदीप खोलगडे व दुसºया दुचाकीवरील एक जण असे एकूण तीन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गावकºयांनी घटनास्थळ गाठून जखमींना पुढील उपचारार्थ कारंजा ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पोलीस स्टेशनला नोंद झाली नव्हती.

Web Title: Two bikes hit face to face; Three people injured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.