रोहित्र नादुरुस्त:  संतापलेले गावकरी, शेतकरी धडकले आसेगाव वीज उपकेंद्रावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:52 PM2017-11-18T14:52:10+5:302017-11-18T14:54:03+5:30

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव वीज उपकें द्रांतर्गत येणाºया वारा येथील फिडरचे रोहित्र नादुरुस्त असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Transfarmer fail: Angry villagers, Farmer reach Aasegaon Power Sub-station | रोहित्र नादुरुस्त:  संतापलेले गावकरी, शेतकरी धडकले आसेगाव वीज उपकेंद्रावर 

रोहित्र नादुरुस्त:  संतापलेले गावकरी, शेतकरी धडकले आसेगाव वीज उपकेंद्रावर 

Next
ठळक मुद्देआसेगाव परिसरातील पिके  संकटात पिण्याच्या पाण्याची समस्या 

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव वीज उपकें द्रांतर्गत येणाºया वारा येथील फिडरचे रोहित्र नादुरुस्त असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे परिसरातील सहा गावांत पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, पीकेही संकटात सापडल्यामुळे या गावांतील ग्रामस्थ व शेतकºयांनी शनिवार १८ नोव्हेंबर रोजी थेट आसेगाव वीज उपकेंद्रावर धडक देऊन रोहित्र तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

आसेगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाºया वारा येथील फिडरवरून कुंभी, लही, वसंतवाडी, वारा, पिंपळगाव आदि गावांतील लोकांना वीज पुरवठा करण्यात येतो. या फिडरचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने या ठिकाणी वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होऊन ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पाणी उपलब्ध असतानाही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शिवाय शेतकºयांनाही रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके सुकत चालली आहेत. या संदर्भात संबंधित कनिष्ठ अभियंत्यांकडे वारंवार तक्रार करून रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेले ग्रामस्थ आणि शेतकºयांनी थेट आसेगाव वीज उपकेंद्रावर शनिवारी धडक दिली. यावेळी शेतकरी गावकºयांसह संबंधित गावांचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचीही उपस्थिती होती. नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी आणि त्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कनिष्ठ अभियंत्यांना यावेळी त्यांनी दिला. 

Read in English

Web Title: Transfarmer fail: Angry villagers, Farmer reach Aasegaon Power Sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.