पतंग उडविताना खबरदारी घ्या - सामाजिक संघटनांनी केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:48 PM2018-01-13T12:48:42+5:302018-01-13T12:49:49+5:30

वाशिम :  मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठया प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्या जात आहे.

Take caution of flying kites - appeals from social organizations | पतंग उडविताना खबरदारी घ्या - सामाजिक संघटनांनी केले आवाहन

पतंग उडविताना खबरदारी घ्या - सामाजिक संघटनांनी केले आवाहन

Next
ठळक मुद्देमकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव पतंगांच्या दुकानांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  मकरसंक्रांतीनिमित्त शहरामध्ये मोठया प्रमाणात पतंग उडविल्या जात असल्याने जागोजागी शहरात दुकाने थाटली आहेत. पतंग उडविताना मात्र अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांच्यावतीने केल्या जात आहे.

जिल्हयात विविध कॉलनीमध्ये पतंगोत्सव सुरू झाला असून आकाशात मोठया प्रमाणात पतंग उडतांना दिसून येत आहेत. मात्र पतंग उडविण्याासाठी वापरण्यात येत असलेला दोरा, मांजा घातक असून मांजामध्ये विविध रासायनिक द्रव्य, काच टाकल्या जात असल्याने ते आरोग्यास धोकादायक आहे. पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयाने अनेकांची बोटे कापली जात आहेत. पतंग उडवितांना तो उत्सव म्हणून साजरा करा असे आवाहन विविध सामाजिक संघटनाकडून केल्या जात आहे. तसेच याबाबत जनजागृतीही केल्या जात आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) शरीरासाठी घातक असल्याने याचा वापर टाळावा व कपडे शिवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयाचा वापर करावा. या संदर्भात विविध संघटना शहरात फलके लावून जनजागृती करीत असतांना दिसून येत आहेत.

‘मांजा’मुळे पक्ष्यांच्या जिवित्वास धोका
आधिच विविध मोबाईल कंपन्यांच्या टॉवरमुळे पक्ष्यांच्या संख्येत मोठया प्रमाणात घट झाली आहे. चिमणींचा शोध घेता दिसून येत नाही. पतंग उडविण्यसासाठी वापरण्यात येत असलेला दोरा (मांजा) विजेच्या तारांवर, झाडांवर गुुंतून राहत असल्याने याचा पक्ष्यांच्या जिवित्वास धोका निर्माणझाला आहे. पक्षी या दोºयामध्ये अडकून त्यांचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साधा दोरा वापरण्याचे आवाहन सावली प्रतिष्ठानचे राम धनगर यांनी केले.

पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयाला कनिक, फेविकॉल किंवा चिक्कीचा वापर करून काचाची भुकटी लावण्यात येते. तसेच काही रासायनिक द्रव्य मिसळूनही ‘मांजा ’ तयार केला जातो . सदर मांजा आरोग्यासाठी घातक आहे.

बालकांसाठी कार्टून पतंग
बाजारात लागलेल्या दुकानांमध्ये बालकांसाठी विशेष पतंग विक्रीस आले आहेत. यामध्ये बेन टेन, डयूक अ‍ॅन्ड डोनॉल्ड, शक्तीमान, भिम यांच्यासह कार्टून पात्राचे चित्र पतंगवर आहे.

पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या दोºयामध्ये रासायनिक द्रव्यांचा अवलंब होत आहे. पूर्वी तयार केल्या जाणाºया मांजापेक्षा तो त्वचेसाठी हानीकारक आहे. तो न वापरणेच बरे.

- डॉ. अनिल कावरखे
वैद्यकीय अधिकारी, जिसारू, वाशिम

Web Title: Take caution of flying kites - appeals from social organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.