पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मंगरुळपीर येथे निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:09 PM2018-02-21T14:09:02+5:302018-02-21T14:11:27+5:30

मंगरुळपीर - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या अल्पवयीन अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणाऱ्या  घटनेचा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा जिल्हाचे वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

take action against accused in rape case, memorandum to SDO | पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मंगरुळपीर येथे निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

पाच वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराचा मंगरुळपीर येथे निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

ठळक मुद्दे संस्था चालकाने पीडित मुलीच्या आई - वडिलांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणला असल्याचे  निवेदनात नमुद  आहे. मागणीचे निवेदन वाशीम जिल्हाध्यक्ष शिवदास सुर्यपाटील यांचे नेतृत्वात समाज बांधवाच्या स्वाक्षरीने मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेश  पारनाईक यांना  देण्यात आले. निवेदनाच्या प्रती  मुख्यमंत्री  फडणविस यांना पाठविण्यात  आल्या  आहेत.

मंगरुळपीर - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या अल्पवयीन अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणाऱ्या  घटनेचा महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा जिल्हाचे वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बलात्कार करणाऱ्यांविरुध्द  त्वरित कारवाइ करावी  अशा मागणीचे निवेदन वाशीम जिल्हाध्यक्ष शिवदास सुर्यपाटील यांचे नेतृत्वात समाज बांधवाच्या स्वाक्षरीने मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी राजेश  पारनाईक यांना  देण्यात आले. 

या अमानवी कृत्याचा  संपुर्ण जिल्ह्यातुन  निषेध करण्यात करण्यात आला आहे. ज्या संस्थेत हा अमानुष प्रकार घडला तेथील संस्थाचालकाने या गुन्हेगारास तात्काळ पोलिसांच्या तावडीत देणे गरजेचे असतांनाच सदर संस्था चालकाने पीडित मुलीच्या आई - वडिलांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणला असल्याचे  निवेदनात नमुद  आहे. याबाबत  राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे व प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार करण्यात आली असून पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आ.जयदत्त अण्णा क्षीरसागर  पाठपुरावा करणार आहे. तसेच गुन्हेगाराला वाचविण्याचा प्रयत्न करून पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव टाकणाºया व्यक्तीच्या विरोधात देखील कुठल्याप्रकारे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्रांतीक तैलीक महासभेचे वाशीम जिल्हाध्यक्ष शिवदास सुर्यपाटील,कार्याध्यक्ष दत्तात्रय भेराणे, सचीव सुरेश माणिकराव, महिला  आघाडी जिल्हाध्यक्षा तारा महिंद्रे, कार्याध्यक्षा शिवानंदा केदारे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी अमोल ढेंगाळे, विजय भोजने, युवा कार्याध्यक्ष राम राउत, डॉ.सुधाकर क्षीरसागर,  गोपाल माचलकर, प्रकाश  रायके, नथ्थुजी रायके, सुरेश हिवरकर, सुनिल हरणे, रामदास  हरणे यांचे सह  समाज बांधवाच्या स्वाक्षºया आहेत.निवेदनाच्या प्रती  मुख्यमंत्री  फडणविस यांना पाठविण्यात  आल्या  आहेत.

Web Title: take action against accused in rape case, memorandum to SDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.