शिवसैनिक व शेतक-यांनी काढली बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 09:23 PM2017-11-24T21:23:47+5:302017-11-24T21:29:30+5:30

कारंजा तालुक्यातील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, फसवणूक करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी २४ नोव्हेंबर रोजी बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त केला.

Symbolic funeral of Bt seeds removed by Shivsainik and farmers! | शिवसैनिक व शेतक-यांनी काढली बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा!

शिवसैनिक व शेतक-यांनी काढली बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा!

Next
ठळक मुद्देकारंजात उत्स्फूर्त प्रतिसादबियाणे कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, शेतक-यांची फसवणूक    करणा-या बीटी बियाणे कंपनीविरूद्ध तत्काळ गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी शिवसैनिक व शेतक-यांनी येथे २४ नोव्हेंबर रोजी चक्क बीटी बियाण्याची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आपला संताप व्यक्त केला. शिवसेना जिल्हाप्रमुख, राजेश पाटील व माजी जि.प. सदस्य शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे नेतृत्व केले.
शेतकरी निवासापासून निघालेल्या या प्रतिकात्मक प्रेतयात्रेची सांगता झाशी राणी चौकात करण्यात आली. वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे मत यावेळी राजेश पाटील यांनी व्यक्त केले. या आंदोलनात उपतालुका प्रमुख बबन हळदे, जगदीश पाटील थेर, पंचायत समिती सदस्य रवी भुते, सर्कल प्रमुख संदीप राठोड, विनोद गाडगे, गणेश मांजरे, संतोष बोन्ते, शाम भगत, जितेंद्र बोबडे, राजू वानखडे, प्रशांत भदाडे, माणिकराव पावडे, बंडु लहानकर, अंबादास भांडे, संजय जिरापुरे, सुभाष उपाध्ये, गजानन टाके, अनंता लोडोने, विभाग प्रमुख घनश्याम जयराज, पवन गुल्हाने यांच्यासह अनेक गावातील सरपंच व शेतकरी उपस्थित होते. 

Web Title: Symbolic funeral of Bt seeds removed by Shivsainik and farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.