Suspected death of elderly woman in Washim | वाशिम येथील वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू 

ठळक मुद्देबिलाल नगर परिसरातील घटनाबुधवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  येथील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेची वृत्त लिहिस्तोवर पोलीस स्टेशनला नोंद नव्हती. 
प्राप्त माहितीनुसार बिलाल नगर परिसरात शे. हकीम शे. लाल (वय ६५) व त्यांच्या पत्नी तजमुनबी शेख हकिम (वय ६0) हे दोघे एकत्र राहत होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा आईला भेटायला गेला असता तजमुनबी शेख हकीम या घरातील पलंगाजवळ मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या चेहर्‍यावर रक्ताचे डाग आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली. घटना घडल्यापासून मृतक महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचा मोबाइल बंद असून, तो वृत्त लिहीपर्यंत घरी पोहोचला नव्हता. 
या घटनेची माहिती कुटुंबीयांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक वाढवे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयामध्ये पाठविला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वृद्धेच्या मृत्यूचे कारण समजून येईल.