मालेगाव येथील पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:11 AM2017-11-28T09:11:03+5:302017-11-28T09:16:25+5:30

मालेगाव (वाशिम) येथील रहिवासी तथा वाशिम येथील पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राहुल विलासराव रोकडे (वय २८) यांनी २६ नोव्हेंबर रोजी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by the police! | मालेगाव येथील पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालेगाव येथील पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या!

Next
ठळक मुद्देवाशिम येथील पोलीस दलात होता कार्यरतशेतातील झाडाला गळफास लावून संपविली जीवनयात्रामालेगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): येथील रहिवासी तथा वाशिम येथील पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राहुल विलासराव रोकडे (वय २८) यांनी २६ नोव्हेंबर रोजी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, राहुल रोकडे हे गेल्या काही दिवसांपासून कुठल्यातरी कारणाने अस्वस्थ होते. वडिलांनी विचारणा केल्यानंतरही त्यांनी ते कारण सांगितले नाही आणि २६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास नागरतास शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.
 या प्रकरणी आश्रू सोनाजी रोकडे यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.  त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Suicide by the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.