अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:29 PM2018-11-18T13:29:42+5:302018-11-18T13:29:49+5:30

वाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व व्यावसायिक अभ्यासक्रमांना निर्वाह भत्ता योजनेचे सन २०१८-१९ या शैक्षणिक वषार्तील अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.

Submit scholarships application students of Scheduled Tribe urgently | अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने सादर करा

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने सादर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व व्यावसायिक अभ्यासक्रमांना निर्वाह भत्ता योजनेचे सन २०१८-१९ या शैक्षणिक वषार्तील अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार नाहीत. सर्व महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी अर्ज सादर करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिले. 
महाराष्ट्र शासनाने  शिष्यवृत्तीसाठी नवीन संकेतस्थळ विकसित केले असल्याने सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचे अर्ज याच शैक्षणिक वर्षात भरणे बंधनकारक आहे. या वर्षीचे अर्ज पुढील शैक्षणिक सत्रात भरता येणार नाहीत. या कारणामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील, असा इशाराही प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिला. आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याच्या सूचना यापूर्वीच महाविद्यालय व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तथापि अद्याप काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावे. शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन भरावयाचे असल्याने विद्यार्थ्यांच्या अर्जांची प्रिंट व विद्यार्थ्यांची संपूर्ण कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांनी जतन करून ठेवावीत, महाविद्यालयीन स्तरावरून विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्या, अशा सूचना सोनवणे यांनी दिल्या.

Web Title: Submit scholarships application students of Scheduled Tribe urgently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.