रहदारीस अडथळा ठरू पाहणाऱ्या हातगाड्यांवर धडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 03:04 PM2019-01-13T15:04:07+5:302019-01-13T15:04:28+5:30

वाशिम : ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणारा पाटणी चौक ते शिवाजी चौक हा मार्ग रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, अन्य साहित्य विक्री करणारे लघुव्यावसायिक आणि फळविक्रेत्यांनी गिळंकृत केला

Striking an obstacle on the traffic jam! | रहदारीस अडथळा ठरू पाहणाऱ्या हातगाड्यांवर धडक कारवाई!

रहदारीस अडथळा ठरू पाहणाऱ्या हातगाड्यांवर धडक कारवाई!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणारा पाटणी चौक ते शिवाजी चौक हा मार्ग रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, अन्य साहित्य विक्री करणारे लघुव्यावसायिक आणि फळविक्रेत्यांनी गिळंकृत केला. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी दैनंदिन वाहतूक विस्कळित होण्यासोबतच रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यासंबंधी ‘लोकमत’ने भाजीविक्रेत्यांचा प्रमुख रस्त्यावरच ठिय्या, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेवून शहर वाहतूक विभागाने रविवारी धडक कारवाईची मोहिम हाती घेतल्याचे दिसून आले.
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरातील आठवडी बाजार हटवून तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच भरविला जावा, अशा सक्त सूचना साधारणत: १० वर्षांपूर्वी सर्व व्यावसायिकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. रविवारच्या आठवडी बाजाराशिवाय रोजच पाटणी चौक ते शिवाजी चौक या शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला बसून भाजीविक्री आणि अन्य साहित्य विक्री करण्यासोबतच फळविक्रेते व्यावसायिक आपल्या हातगाड्याही अगदीच रस्त्याच्या मधोमध उभ्या करित असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंबंधी ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक विनायक जाधव यांच्या नेतृत्वात अन्य वाहतूक कर्मचाºयांनी कारवाईची धडक मोहिम हाती घेवून वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
 
नगर परिषदेची भुमिका संतापदायक
रहदारीस अडथळा ठरू पाहणारे अतिक्रमण हटविणे, ते पुन्हा होवू नये यासाठी प्रयत्न करणे, शहरांतर्गत वाहतूक सुरळित ठेवणे आदींकडे वास्तविक पाहता नगर परिषदेने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. मात्र, नगर परिषदेचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असून रविवारी शहर वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू असताना त्याठिकाणी नगर परिषदेचा एकही कर्मचारी हजर नव्हता. पालिकेच्या या भुमिकेप्रती अनेकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: Striking an obstacle on the traffic jam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.