वाशिम जिल्हयात मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:17 PM2018-07-02T13:17:21+5:302018-07-02T13:20:17+5:30

वाशिम :  मच्छीमारांच्या आर्थीक बळकटीकरणासाठी व पुरक व्यवसायाकरिता मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत केंद्र पुरस्कृत नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना सन २०१८-१९ या आर्थीक वर्षाकरिता राबविण्यात येत असून या योजनेव्दारे मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. 

Strengthening of fishermen organizations in Washim district | वाशिम जिल्हयात मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण

वाशिम जिल्हयात मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण

Next
ठळक मुद्दे७ हजार ३२१ हेक्टर जलक्षेत्र मत्स व्यवसायाकरिता उपलब्ध असून यावर जिल्हाभरात १४५ संस्था कार्यारत आहे. क्रियाशील मच्छीमाराकरिता गटविमा योजनेतून मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

 - नंदकिशोर नारे  
वाशिम :  मच्छीमारांच्या आर्थीक बळकटीकरणासाठी व पुरक व्यवसायाकरिता मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत केंद्र पुरस्कृत नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना सन २०१८-१९ या आर्थीक वर्षाकरिता राबविण्यात येत असून या योजनेव्दारे मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. 
वाशिम जिल्हयामध्ये पाटबंधारे विभागाच्या मालकीचे १२७ तलाव असून जि.प.वाशिमचे ९७ व  काही नगर परिषद हद्दीतील असे एकूण २२७ च्या जवळपास तलाव आहे. एकूण ७ हजार ३२१ हेक्टर जलक्षेत्र मत्स व्यवसायाकरिता उपलब्ध असून यावर जिल्हाभरात १४५ संस्था कार्यारत आहे. याचे एकूण पाच हजार सभासद कार्यरत आहेत. याच मच्छीमार संस्थेच्य ासभासदासाठी त्याच्या आर्थीक बळकटी करणासाठी तसेच पूरक व्यवसाय व पायापुत सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नवीन मत्स्यसंवर्धन तळी तयार करणे भारतीय प्रमुख कॉर्प व इतर संवर्धनक्षम माशांच्या बीज निर्मीतीसाठी मत्स्यबीज केंद्राची स्थापना करणे,  मत्स्यबीज संवर्धन ,तलाव संच निर्मिती करणे,  जलाशयात पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करणे,  मत्स्यंसवर्धन तळयाचे नुतणीकरण करणे , भुजलाशयी  मुलभुत सुविधा पुरविण्याची योजना या अंतर्गत नवीन नौका व जाळे, खरेदीबाबत लघू मत्स्यखाद्य बनवण्याच्या कारखान्याची स्थापना,  क्रियाशील मच्छीमाराकरिता गटविमा योजनेतून मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.  या सर्व योजनामध्ये होणाºया खर्चाकरिता शासन हिस्सा ४० टक्के व लाभार्थी हिस्सा ६० टक्के राहील. या सर्व योजनाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक मच्छीमार सहकारी संस्थानी  किेंवा मच्छीमारानी विहीत नमुन्यात संबंधित सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय वाशिम यांच्याशी संपर्क करणे गरजेचे असल्याची माहिती सहायक मत्सव्यवसायिक अधिकारी यांनी लोकमतशी बोलतांना दिली. 
 
ज्या मच्छीमाराला किंवा मच्छीमार संस्थाला निलक्रांती योजनेचा लाभ घ्यावयसाचा आहे त्यांनी रेल्वे स्टेशन जवळील सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी त्वरित कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा व अर्जाचा विहीत नमूना घेवून योजनेचा लाभ घ्यावा. 
-सुभाष ना.सुखदेव, सहाय्यक मत्स्य व्यवसायक अधिकारी वाशिम

Web Title: Strengthening of fishermen organizations in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.