वाशिममध्ये शुक्रवारी  राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा: सामाजिक संघटनांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:52 PM2018-02-08T17:52:11+5:302018-02-08T17:53:06+5:30

वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे.

State-level dance competition on Friday in Washim | वाशिममध्ये शुक्रवारी  राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा: सामाजिक संघटनांचे आयोजन

वाशिममध्ये शुक्रवारी  राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा: सामाजिक संघटनांचे आयोजन

Next
ठळक मुद्देजिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियंका मीणा यांच्या हस्ते होणार आहे.यात इच्छुक कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. यात इच्छुक कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय संस्था, राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशिय संस्था, सम्राट अशोक बहुउद्देशिय संस्था, स्वामी विवेकानंद सामाजिक बहुउद्देशीय संस्था, शिरपूर, युगगुरू बहुउद्देशिय संस्था, रिठद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमान होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रियंका मीणा यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे, सामाजिक वनिकरण अधिकारी कैलास राठोड, तहसिलदार बळवंत अरखराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, खुशबु चोपडे, प्राचार्य रेखा अढाव, नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विपुल जाधव, सोनु शिंदे, भगवान ढोले, अविनाश नाईक, कैलास सुर्वे, कपिल भालेराव, अभय देशपांडे, अमोल खडसे, गौरी देशपांडे, सुमेध तायडे, पुजा शिंदे, सोनल तायडे, स्नेहल तायडे, तुषार घेवारे, विकास पट्टेबहादूर, सत्येंद्र भगत, डॉ. अर्जून ठाकुर, सुभाष रोकडे, गिरीष देशमुख, प्रशांत राठोड, महादेव क्षिरसागर आदिंनी केले आहे.

Web Title: State-level dance competition on Friday in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.