२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:07 PM2019-01-20T18:07:20+5:302019-01-20T18:07:34+5:30

आॅनलाईन अर्ज : २८ फेब्रुवारी अंतिम मुदत लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम  : खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश ...

Start of 25% free admission process | २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

Next


आॅनलाईन अर्ज : २८ फेब्रुवारी अंतिम मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित पालकांना २८ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. 
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांतील पाल्यांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. एस.सी., एस.टी. प्रवर्गातील पाल्यांना उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही. पालकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पड ूनये, कोणत्याही मध्यस्थांसोबत आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले. खुल्या प्रवर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असणेआवश्यक आहे. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत पाल्याला इंग्रजी  किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. आॅनलाईन अर्जासोबत रहिवाशी पुरावा जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणुक ओळखपत्र, वीज देयक, घरपट्टी, कर  पावती, पाणीपट्टी वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पाल्याच्या जन्माचा दाखला, एस.टी. व एस.सी. प्रवर्गातील पाल्यांसाठी पालकाचा जातीचा दाखला, ओबीसी तसेच खुल्या प्रवर्गातील पाल्यांसाठी पालकाचा एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला आवश्यक आहे.

Web Title: Start of 25% free admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.