वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दराने गाठला ३४०० चा टप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:29 PM2018-01-16T16:29:51+5:302018-01-16T16:31:30+5:30

वाशिम : सोयाबीनचे दर तेजीत असून, मंगळवारी सोयाबीनच्या दराने ३४०० चा टप्पा गाठला. दुसरीकडे तूरीचे दर ४००० ते ४७०० रुपयादरम्यान स्थिर असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. 

soybean rate rech 3400 Rs per quintal at Washim Market Committee! | वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दराने गाठला ३४०० चा टप्पा !

वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दराने गाठला ३४०० चा टप्पा !

Next
ठळक मुद्देसुरूवातीला सोयाबीनला १८०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाल्याने मातीमोल भावात सोयाबीनची विक्री करावी लागली. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला सोयाबीनने ३००० ते ३२०० चा टप्पा गाठला होता.१६ जानेवारी रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनला ३००० ते ३४०० रुपये या दरम्यान प्रती क्विंटल दर राहिला.

वाशिम : सोयाबीनचे दर तेजीत असून, मंगळवारी सोयाबीनच्या दराने ३४०० चा टप्पा गाठला. दुसरीकडे तूरीचे दर ४००० ते ४७०० रुपयादरम्यान स्थिर असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. 

गतवर्षी शेतकºयांना निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट आली. त्यातच सुरूवातीला सोयाबीनला १८०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाल्याने शेतकºयांना मातीमोल भावात सोयाबीनची विक्री करावी लागली. दिवाळीदरम्यान २३०० ते २८०० रुपयादरम्यान सोयाबीनला दर होते. तेव्हाही बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची विक्री केली. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला सोयाबीनने ३००० ते ३२०० चा टप्पा गाठला होता. १६ जानेवारी रोजी वाशिम बाजार समितीत सोयाबीनला ३००० ते ३४०० रुपये या दरम्यान प्रती क्विंटल दर राहिला. आवक २७०० क्विंटल होती. दुसरीकडे नवीन तूर मोठ्या प्रमाणात बाजारात येत असताना, तूरीचे दर मात्र ४००० ते ४७०० दरम्यान स्थिर असल्याचे दिसून येते. अद्याप नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना मातीमोल भावाने बाजार समिती व अन्य खासगी व्यापाºयांना तूरीची विक्री करावी लागत आहे.

Web Title: soybean rate rech 3400 Rs per quintal at Washim Market Committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.