सहा हजार अर्जांची उद्या छानणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 07:00 PM2017-09-24T19:00:05+5:302017-09-24T19:00:43+5:30

वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४०६ आणि सदस्य पदाकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छानणी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छूकांसह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. 

Six thousand applications tomorrow! | सहा हजार अर्जांची उद्या छानणी!

सहा हजार अर्जांची उद्या छानणी!

Next
ठळक मुद्दे२७३ ग्रामपंचायतची निवडणूक छानणीकडे जिल्हावासिंयाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. २२ सप्टेंबर या अंतिम मुदतीपर्यंत सरपंच पदाकरिता १४०६ आणि सदस्य पदाकरिता ४७५७ अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची छानणी सोमवार, २५ सप्टेंबर रोजी होत असून, यामध्ये किती आणि कुणाचे अर्ज बाद होतात, याकडे इच्छूकांसह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. 
आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील ४९१ पैकी २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ५१ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणूकीकरिता १५ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्विकारण्यात आले. त्यानुसार, जिल्हाभरातून सरपंच पदासाठी १४०६ आणि सदस्य पदासाठी ४७५७, असे एकूण ६१६३ अर्ज प्राप्त झाले. या सर्व अर्जांची छानणी २५ सप्टेंबर रोजी त्या-त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात होणार असून या प्रक्रियेत प्रत्यक्ष किती अर्ज त्रुटींमध्ये अथवा इतर कारणांवरून बाद होतात, याकडे इच्छूक उमेदवारांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Six thousand applications tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.