शिरपूर जैनमधील पशूधन विकास अधिकारी पद रिक्त; १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 06:12 PM2018-01-18T18:12:13+5:302018-01-18T18:13:38+5:30

शिरपूर जैन: येथील पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकाºयाची अबदली आॅक्टोबर २०१७ च्या सुरुवातीला करण्यात आली. तेव्हापासून या केंद्रात नवे अधिकारी रुजू झालेच नाही. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणा-या १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावरच आहे. 

Sharpur Jain's post of animal husbandry officer is vacant; 14 thousand animal health on health! | शिरपूर जैनमधील पशूधन विकास अधिकारी पद रिक्त; १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावर! 

शिरपूर जैनमधील पशूधन विकास अधिकारी पद रिक्त; १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावर! 

Next
ठळक मुद्देशिरपूर जैन पशूवैद्यकीय केंद्रांतर्गत १३ गावे येतातसर्व गावांत मिळून एकूण पशूधनाची संख्या ही १४ हजारांहून अधिक आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: येथील पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकाºयाची अबदली आॅक्टोबर २०१७ च्या सुरुवातीला करण्यात आली. तेव्हापासून या केंद्रात नवे अधिकारी रुजू झालेच नाही. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणा-या १४ हजार पशूधनाचे आरोग्य वा-यावरच आहे. 
शिरपूर जैन पशूवैद्यकीय केंद्रांतर्गत १३ गावे येतात. या सर्व गावांत मिळून एकूण पशूधनाची संख्या ही १४ हजारांहून अधिक आहे. या सर्व पशूंवर नियमित लसीकरण करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी येथे डॉ. स्वप्नील महाळंकर या पशूधन विकास अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली; परंतु ६ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांची या केंद्रातून बदली करण्यात आली आणि त्यांनी या दिवशीच आपला प्रभारही सोडला. त्यांच्या ठिकाणी डॉ. जया राऊत या महिला पशूधन विकास अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली; परंतु आता पाच महिने उलटत आले तरी, शिरपूर येथील पशूवैद्यकीय केंद्रात त्या रुजू झाल्या नाहीत. त्यामुळे या कें द्रांतर्गत येणाºया १३ गावातील पशूंवर नियमित उपचार करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, रिठद येथील केंद्राचे पशूधन विकास अधिकारी पी. एन. कापगाते यांच्याकडे शिरपूरच्या पशूवैद्यकीय केंद्राची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना शिरपूरच्या केंद्रात आठवड्यातून दोन वेळा भेट देऊन पशूंवर उपचार करावे लागतात. तथापि, केवळ दोन दिवसांत १४ हजारांवर पशूंचे उपचार करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे येथील पशूपालकांना नाईलाजास्तव खासगी पशूवैद्यकांकडे धाव घ्यावी लागत आहे. दरम्यान, या संदर्भात पी. एन. कापगाते यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेतली असता. आपणांकडे दिलेली जबाबदारी पार पाडण्याशिवाय आपण याबाबत काहीच सांगू शकणार नसल्याचे, तसेच येथील नियमित अधिकारी रुजू कधी होतील, याबाबत जिल्हास्तरावरूनच माहिती मिळू शकेल, असेही त्यांनी  सांगितले.
 

Web Title: Sharpur Jain's post of animal husbandry officer is vacant; 14 thousand animal health on health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम