Respect for Shivaji Maharaj's deeds | शिवरायांच्या कर्तबगारीचा तरूणाई करतेय आदर  
शिवरायांच्या कर्तबगारीचा तरूणाई करतेय आदर  


जयंतीउत्सवाची धडपड: पुतळ्यांच्या खरेदीसाठी झुंबड 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी साजरी होणार आहे. रयतेचे राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीचे महत्त्व तरुणाईला कळत आहे. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष साजरा करण्यासाठी तरूण मंडळी सरसावली आहे. यासाठी विविध ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यांची खरेदी करण्यासाठी झुंबड होत असल्याचे दिसत आहे.
स्वराज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रुविरुध्ह लढा देताना महाराष्ट्रातल्या डोंगर-दºयांचा अनुकूल वापर करत गनिमी कावा पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुख्यत: मुघल साम्राज्य यांच्याशी लढा देत मराठा साम्राज्य उभे केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्या बलाढ्य स्थानिक सरदार, किल्लेदार यांच्या अत्याचार आणि अन्यायापासून शिवाजी महाराज यांनी जनतेची सुटका केली. सामन्यांचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे. या इतिहासाची जाण वाशिम जिल्ह्यातील तरुणाईला होऊ लागली आहे. शिवाजी महाराज युवकांना कळू लागले आहेत. त्यामुळेच या आदर्श राजांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ते धडपडताना दिसत आहेत. शिवाजी महाराजांची महती जनतेला कळल्याचे मूर्तीकारांनीही ताडले आहे. जनभावनांचा आधार व्यवसायाला देण्यासाठी वाशिम शहरात शिवाजी महाराजांच्या लहान आकारातील पुतळ्यांची दुकाने त्यांनी थाटली आहेत. रस्त्याच्याकडेला थाटलेल्या या दुकानांवर युवक मंडळी शिवरायांच्या पुतळ्याचे बुकिंग करीत आहेत.


Web Title: Respect for Shivaji Maharaj's deeds
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.