ग्राम बालविकास केंद्रातून कुपोषित बालकांना मिळणार उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 10:48 AM2017-11-30T10:48:16+5:302017-11-30T10:51:10+5:30

कुपोषित बालकांवर आरोग्य कर्मचाºयांच्या निगराणीत योग्य उपचार मिळावे यासाठी अंगणवाडी केंद्र स्तरावर ग्राम बालविकास केंद्र स्थापन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून अंगणवाडीतील बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे.

Remedies for malnourished children from village child development center | ग्राम बालविकास केंद्रातून कुपोषित बालकांना मिळणार उपचार!

ग्राम बालविकास केंद्रातून कुपोषित बालकांना मिळणार उपचार!

Next
ठळक मुद्देसर्वेक्षण अंतिम टप्प्यात उपचारासाठी तीन महिन्याचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - कुपोषित बालकांवर आरोग्य कर्मचाºयांच्या निगराणीत योग्य उपचार मिळावे यासाठी अंगणवाडी केंद्र स्तरावर ग्राम बालविकास केंद्र स्थापन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून अंगणवाडीतील बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणाअंती अतितिव्र, तीव्र कुपोषित बालकांचे वर्गीकरण करून ग्राम बालविकास केंद्रांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषक आहार दिला जातो. तीव्र कुपोषित गटातील बालकांना अंगणवाडी स्तरावरच तीन महिने सतत उपचार मिळावे यासाठी ग्राम बालविकास केंद्राची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रातील बालकांचे सर्वेक्षण व तपासणी केली जात आहे.
प्रत्येक गावात बालकांचे वजन, उंची, लांबी व दंडघेर घेऊन बालकांचे वर्गीकरण करणे आणि तिव्र कुपोषित आढळून आल्यास त्या बालकाला ग्राम बालविकास केंद्रात पोषक आहार व औषधी दिली जाणार आहे. येथे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांची निगराणी राहणार आहे, असे वाशिमचे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले. साधारणत: १५ डिसेंबरपर्यंत बालकांचे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. त्यानंतर ग्राम बालविकास केंद्रांची संख्या निश्चित होईल, असेही नायक यांनी सांगितले.

असा मिळणार उपचार.. !
कुपोषित बालकांना कोणत्या पोषण तत्वांचा अतिरिक्त डोज द्यायचा, याचा एकंदरित अंदाज येणार आहे. त्यानुसार अतितिव्र गटातील कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रीत करून तीन महिने उपचार केले जाणार आहे. आरोग्य कर्मचाºयांच्या निगराणीत काळजी घेतली जाणार आहे. अतिरिक्त आहार पुरविणे, पोषण तत्वांचा अतिरिक्त डोज देणे आदी प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Remedies for malnourished children from village child development center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य