ठळक मुद्देशेतकºयांना नाफेडच्या खरेदीची प्रतिक्षा

वाशिम: जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यात कारंजा बाजार समितीमध्ये या शेतमालाची विक्रमी आवक होत असून, गेल्या आठ दिवसांत या ठिकाणी दरदिवशी सरासरी १० हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. दुसरीकडे बाजारात सोयाबीनला अपेक्षीत दर मिळत नसल्याने शेतकºयांना नाफेडची खरेदी सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.

सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात विभागात वाशिम जिल्हा दुसºया स्थानी आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून, यंदा जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली होती. त्याची काढणी पूर्ण उरकली आहे. त्यानंतर शेतकºयांनी सोयाबीन सुकवून ते विकण्यासाठी बाजारात टाकणे सुरू केले आहे. रब्बीच्या हंगामासाठी लागणारा खर्च, खरीप हंगामात शेतीसाठी केलेली देणीघेणी आदिंचा ताळमेळ जुळविण्यासाठी शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची प्रचंड आवक होत आहे. त्यात कारंजा बाजार समितीमध्ये, तर दरदिवशी सरासरी १० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. तथापि, शेतकºयांना अपेक्षीत भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत या शेतमालास राष्ट्रीयस्तरावरच उठाव नसल्याने दरावर परिणाम झालेला आहे. कारंजा बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत २४०० ते २६५० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत. शासनाचे हमीभाव प्रति क्विंटल ३०५० रुपये असताना बाजारात मिळणारे दर हे जवळपास ५०० रुपयांनी कमी आहेत; परंतु व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतकºयांना सोयाबीन विकण्याशिवाय पर्यायही उरलेला नाही. त्यातच नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने शेतकºयांना नाईलाजास्तव बाजार समित्यांमध्येच सोयाबीनची विक्री करावी लागत आहे.