बलात्कारातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 08:03 PM2017-10-24T20:03:13+5:302017-10-24T20:03:43+5:30

वाशिम :  एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून दोन आरोपींनी संगनमत करून तिचेवर नाशिक शहरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ आॅक्टोबरपूर्वी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला जेरबंद करण्यात शहर पोलीसांना यश आले. 

Rape accused police net! | बलात्कारातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात !

बलात्कारातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात !

Next
ठळक मुद्देवाशिम शहरातील घटना दुसरा आरोपी फरारच

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून दोन आरोपींनी संगनमत करून तिचेवर नाशिक शहरामध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ आॅक्टोबरपूर्वी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला जेरबंद करण्यात शहर पोलीसांना यश आले. 
वाशिम शहरात वास्तव्यास असलेल्या एका २२ वर्षीय महिलेला स्वप्नील दिनकर इंगळे (रा. निमजगा, वाशिम) याने लग्नाचे अमिष दाखवून तिला नाशिक येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीमध्ये स्वप्नील इंगळे व त्याचा नाशिक येथील मित्र रवी मोरे या दोघांनी संगनमत करून पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. 
पिडीत महिलेने या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ९ आॅक्टोबरला फिर्याद नोंदविली. पोलीसांनी स्वप्नील इंगळे व रवी मोरे या दोघांविरूध्द भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६, ३५४ (अ), ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वप्नील इंगळे हा वाशिम शहरामधुन पसार झाला होता. इंगळे हा वाशिम शहरात आल्याची माहिती ठाणेदार विजय पाटकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक नम्रता राठोड, जमादार नितिन काळे, विष्णु बोंडे, अमोल गिºहे, सतिष गुडदे, दिलीप लेकुळे, धनंजय अरखराव यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचुन आरोपी इंगळे याला अटक केली. या घटनेतील दुसरा आरोपी रवी मोरे याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. 

Web Title: Rape accused police net!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा