खासदार राजीव सातव मारहाण प्रकरणाचा युवक काँग्रेसतर्फे निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 05:18 PM2017-12-07T17:18:02+5:302017-12-07T17:22:01+5:30

रिसोड - सौराष्ट्र गुजरातचे प्रभारी, कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांना गुजरात निवडणुकीचे प्रचार कार्य करीत असतांना राजकोट पोलिसांनी सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देत मारहाण केली. या प्रकाराचा निषेध करीत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीविरूध्द कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन रिसोड तहसिलदारांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तालुका व युवक काँग्रेसच्यावतीने ६ डिसेंबरला देण्यात आले.

Rajiv Seventh beaten case protests by Youth Congress Risod | खासदार राजीव सातव मारहाण प्रकरणाचा युवक काँग्रेसतर्फे निषेध 

खासदार राजीव सातव मारहाण प्रकरणाचा युवक काँग्रेसतर्फे निषेध 

Next
ठळक मुद्दे निवेदन रिसोड तहसिलदारांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे देण्यात आले.सखोल चौकशी करून दोषीविरूध्द कडक कारवाईची मागणी

रिसोड - सौराष्ट्र गुजरातचे प्रभारी, कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांना गुजरात निवडणुकीचे प्रचार कार्य करीत असतांना राजकोट पोलिसांनी सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देत मारहाण केली. या प्रकाराचा निषेध करीत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीविरूध्द कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन रिसोड तहसिलदारांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तालुका व युवक काँग्रेसच्यावतीने ६ डिसेंबरला देण्यात आले.

भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य गुजरात पोलिसांनी केले आहे. त्यांच्या या कृत्याचा रिसोड येथे आमदार अमित झनक यांच्या सुचनेवरून युवक कॉंग्रेस पक्षाकडून तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, दोषींविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब खरात,  बबनराव गारडे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाशराव वायभासे, युवक काँग्रेसचे रिसोड-मालेगाव विधानसभा अध्यक्ष बाबुराव शिंदे, काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संतोष बाजड, आकातराव सरनाईक, पंजाबराव अवचार, सदाशिवराव झनक, गजानन निखाते, संदीप खराटे, सुरेशराव नरवाडे, गोपाल मोरे, डॉ. शंकर जाधव, चेतन हाडे, विष्णू मोरे, अमित खडसे, जयराम चोपडे पाटील, रत्तनराव डोईफोडे, मोतीराम नागरे, शे. युसूफ शे. निसाफ, जालिंदर देवकर, दत्ता मगर, गंगाराम खंडागळे, विनोद बोरकर, छगन मोरे, संतोष देव्हडे, सतीश गाडे, अंकुश खरात, गणेश चोपडे, देवेंद्र नरवाडे, दत्तराव बाजड, जनार्धन बाजड, पंढरी नागरे, शे. वाजिद, रियाज भाई, रायभाम जुमडे, गजानन निखाते, संतोष मडके, सतीश मानवतकर, मनिष बाजड यांच्यासह काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: Rajiv Seventh beaten case protests by Youth Congress Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.