वाशिम जिल्ह्यातील ‘एकबुर्जी’ची उंची वाढविण्याचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 04:30 PM2017-11-13T16:30:27+5:302017-11-13T16:32:25+5:30

The question of increasing the height of 'ekburji' Dam stuck in red-carpet |  वाशिम जिल्ह्यातील ‘एकबुर्जी’ची उंची वाढविण्याचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

 वाशिम जिल्ह्यातील ‘एकबुर्जी’ची उंची वाढविण्याचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

Next
ठळक मुद्देप्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षालोकप्रतिनिधींचा पाठपुरावा ठरला अपयशी


वाशिम : शहराची तहान भागविण्यासाठी तसेच शेतकºयांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आलेला आहे. याबाबत विद्यमान आमदार लखन मलिक यांनी सलग पाठपुरावा देखील केला. मात्र, तांत्रिक बाबी समोर करून हा एकबुर्जीची उंची वाढविण्याचा प्रस्ताव लालफितशाहीत गुंडाळून ठेवण्यात आला आहे. 

तत्कालिन नगराध्यक्ष स्व. रामचंद्र राठी यांच्या कार्यकाळात एकबुर्जी प्रकल्प उभारण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांनी यासाठी निधी मंजुर केला होता. तेव्हापासून आजतागायत या प्रकल्पातूनच वाशिम शहराला पाणीपुरवठा सुरू असून नजिकच्या अनेक खेड्यांमधील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी पुरविले जात आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत वाशिम शहराचा झपाट्याने विस्तार होण्यासोबतच सिंचनाची गरजही वाढली आहे. त्यातुलनेत मात्र पाणीपुरवठा करण्याकामी एकबुर्जी प्रकल्प कुचकामी ठरत असल्याने प्रकल्पाची उंची वाढविणे गरजेचे ठरत आहेत. याकडे शासनाने विशेष लक्ष पुरवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

Web Title: The question of increasing the height of 'ekburji' Dam stuck in red-carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण