लिपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 03:53 PM2018-12-16T15:53:24+5:302018-12-16T15:54:02+5:30

वाशिम : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संवर्गातून कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी या संवर्गात पदोन्नती मिळालेल्या आणि विशिष्ट कायमर्यादेत सेवा बजावलेल्या कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी संवगार्तील वर्ग तीन दर्जाच्या कर्मचाºयांना अद्याप सहायक गटविकास अधिकारी या पदावर पदोन्नती मिळालेली नाही.

Promotional process for clerical classes stopped | लिपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया रखडली

लिपिकवर्गीय संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया रखडली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संवर्गातून कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी या संवर्गात पदोन्नती मिळालेल्या आणि विशिष्ट कायमर्यादेत सेवा बजावलेल्या कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी संवगार्तील वर्ग तीन दर्जाच्या कर्मचाºयांना अद्याप सहायक गटविकास अधिकारी या पदावर पदोन्नती मिळालेली नाही. अमरावतीचा अपवाद वगळता अन्य विभागातील पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा लाभ दिला जातो. वर्ग तीन दर्जाच्या कर्मचाºयांमधून (कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी) वर्ग दोन दर्जाच्या सहायक गट विकास अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यासाठी सेवाज्येष्ठता यादीचा आधार घेण्यात येतो. साधारणत: मार्च २०१५ मध्ये अमरावती विभागात पदोन्नती आदेश काढण्यात आले होते. तेव्हापासून ही प्रक्रिया केवळ प्रतिक्षेवरच ठेवण्यात आली आहे. अमरावती विभागाचा अपवाद वगळता अन्य विभागात पदोन्नती प्रक्रिया निकाली काढण्यात आलेली आहे. अमरावती विभागात नियोजित वेळी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अन्य विभागातील कर्मचारी हे सेवाज्येष्ठ ठरत आहेत. त्यामुळे अमरावती विभागातील पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाºयांवर हा एकप्रकारे अन्यायच असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेमधून उमटत आहेत. अमरावती विभागातील पदोन्नतीची ही प्रक्रिया निकाली काढावी, यासाठी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठपुरावाही केला आहे. मात्र, अद्याप हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने तुर्तास सेवाज्येष्ठ कर्मचाºयांना पदोन्नतीची प्रतिक्षाच आहे. दरम्यान, पदोन्नतीच्या प्रतिक्षेतच विभागातील जवळपास तीन ते चार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याचा दावाही कर्मचाºयांनी केला आहे. पदोन्नतीची प्रक्रिया लवकरात लवकर निकाली काढावी, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे.


अमरावती विभागातील पदोन्नती प्रक्रियेची माहिती घेतली जाईल. हा प्रश्न निकाली काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.
- गजेंद्र बावणे
उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती

Web Title: Promotional process for clerical classes stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.