प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जास २४ जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:35 PM2019-06-18T17:35:14+5:302019-06-18T17:36:02+5:30

आॅनलाईन अर्ज भरण्यास २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

primary education diploma course extention application till June 24 | प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जास २४ जूनपर्यंत मुदतवाढ

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जास २४ जूनपर्यंत मुदतवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांच्यामार्फत प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डी.ई.एल.ईडी.) च्या २०१९-२० प्रथम वर्ष आॅनलाईन (शासकीय कोटा) प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १७ जून २०१९ पर्यंत होती.
आॅनलाईन प्रवेश अर्ज विषयक सर्व सूचना, प्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच आॅनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रकही याच संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मिळालेल्या मुदतवाढीत संबंधित उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहनही करण्यात आले.

Web Title: primary education diploma course extention application till June 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.