ठळक मुद्देगृहशास्त्र अभ्यास मंडळाचा उपक्रम भरतकलेसह विविध विषयांवर भित्तीपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर  :  मोतीराम ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा व्दारा संचालीत  यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळांतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ.मोंडे प्रमुख अतिथी  डॉ.वाघोडे रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ.भगत यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ.भोंडे यांनी फित कापुन उद्घाटन केला ते म्हणाल्या की, दैनंदीन  जवीनाशी संबंधीत सर्व विषयांचे ज्ञान सर्वांना व्हावा, जनजागृती  व्हावी म्हणुन  विविध जीवन उपयोग ी विषयाचा या पोस्टरमध्ये समावेश करण्यात आले. या पोस्टर  प्रेझेनटेशन मध्ये विविध विषय जसे रंगाचे वर्गीकरण रंगयोजना, पुष्परचनेकरिता आवश्यक साहित्य, पुष्परचेनेचे  प्रकार,भारतकलेकरिता आवश्यक साहित्य, भारत केलेचे विविध टाके,  कुपोषण विविध आजारावर आहार उपचार जसे रक्तक्षय मधुमेह, कावीळ, आम्लपित्त,अन्न शिजविण्याच्या पध्दती, अन्न खराब होण्याची कारणे, अन्न भेसळीच्या मानवी शरीरावर होणारा परिणाम, अपंग मुलांच्या शैक्षणिक समस्या, शिक्षा, बक्षीस, वेळ, भाषादोष, भावनीक विकास इ.विविध विषयावर पोस्टर   तयार करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये  अनेक  विद्यार्थीनीने पोस्टर  प्रेझेनटेशन अतिशय उत्तम प्रकारे केले तसेच  या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्रा.डॉ.वाघोडे , डॉ.भगत,  डॉ.खंडारे,  डॉ.देवळे ,प्रा.रामेला,  डॉ.खान, डॉ.सासेकर, प्रा.इंगळे, डॉ.रामे , डॉ.वानखेडे, डॉ.चौधरी, प्रा.मते,  गायगोले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले. बी.ए.भाग १ ,२ व ३  च्या सर्व विद्यार्थीनीने सक्रिय सहभाग घेतला व यशस्वी पार पडले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या कार्याचे मान्यवरांनी कौतूक केले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.