वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कारंजा पोलिसांनी वर्षभरात वसूल केला ८ लाखांचा दंड वसुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 06:55 PM2018-01-30T18:55:21+5:302018-01-30T18:58:03+5:30

कारंजा लाड: दिवसेंदिवस अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता कारंजा वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सिट व कागदपत्रे नसणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सन आजवर एक वर्षाच्या कालावधित ७ लाख रुपयांचा दंड वसुल केला.

Police recovered 8 lakh rupees from the violators of the law | वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कारंजा पोलिसांनी वर्षभरात वसूल केला ८ लाखांचा दंड वसुल 

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कारंजा पोलिसांनी वर्षभरात वसूल केला ८ लाखांचा दंड वसुल 

Next
ठळक मुद्देएकूण ५ हजार ३८८ वाहनचालकांवर कारवाई करून ७ लाख ९ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला. कलम ६६, १९२, अंतर्गत ६६७ केसेस करून ९ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला.

कारंजा लाड: दिवसेंदिवस अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता कारंजा वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सिट व कागदपत्रे नसणाºया वाहनचालकांवर कारवाई करून सन आजवर एक वर्षाच्या कालावधित ७ लाख रुपयांचा दंड वसुल केला.

 पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा पोलिसांनी एकूण ५ हजार ३८८ वाहनचालकांवर कारवाई करून ७ लाख ९ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला, तर कलम ६६, १९२, अंतर्गत ६६७ केसेस करून ९ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल केला. कारंजा शहरातील वाढती लोकसंख्या व अरूंद रस्ते यामुळे शहरात वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर येऊन  बरेचदा वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. शिवाय शाळा, महाविद्यालये व शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन वाहनचालक भरधाव वेगाने दुचाकी चालवित असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अल्पवयीन वाहनचालक, ट्रिपल सीट व कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेने ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहिम राबवून दंड वसूल केल्याने भरधाव वेगाने वाहन चालविणाऽया वाहनचालकास काही प्रमाणात बे्रक लागले आहे. कारंजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम एम बोडखे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रंधे, यांच्या मार्गदर्शनात जमादार रविंद्र लोखंडे, गव्हादे, महके, काळीवाले, यांनी कारवाई करून हा दंड वसूल करण्यात आला.  

Web Title: Police recovered 8 lakh rupees from the violators of the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.