मालेगाव वनपरीक्षेत्रात शंभर हेक्टर जमिनीवर होणारा वृक्ष लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:18 PM2018-06-27T18:18:53+5:302018-06-27T18:20:17+5:30

राजुरा/मेडशी : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मालेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत जुलै महिन्यात १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार. या योजनेचा शुभारंभ १ जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांनी दिली.

planting of 100 hectare land in Malegaon forest area! | मालेगाव वनपरीक्षेत्रात शंभर हेक्टर जमिनीवर होणारा वृक्ष लागवड !

मालेगाव वनपरीक्षेत्रात शंभर हेक्टर जमिनीवर होणारा वृक्ष लागवड !

googlenewsNext
ठळक मुद्देवनपरिक्षत्राचे कार्यक्षेत्रात सहा वेगवेगळ्या रोपवन  स्थळांची निश्चिती करण्यात आली.१ जुलै रोजी काळाकामठा येथे शुभारंभ करण्यात येणार आहे.१०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा/मेडशी : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मालेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत जुलै महिन्यात १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार. या योजनेचा शुभारंभ १ जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांनी दिली.
१ लाख १० हजार वृक्षांची लागवडीचा शुभारंभ आमदार अमित झनक, मालेगाव पंचायत समिती सभापती मंगला गवई, उपवनसंरक्षण अधिकारी एस.बी.वाळवी, विभागीय वनअधिकारी राठोड, अकोलाचे सहाय्यक वनसंरक्षक नितीन गोंडाने यांचे उपस्थितीत १ जुलै रोजी काळाकामठा येथे शुभारंभ करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने वनपरिक्षत्राचे कार्यक्षेत्रात सहा वेगवेगळ्या रोपवन  स्थळांची निश्चिती करण्यात आली. मैराळडोळ येथील १५ हेक्टर जमिनीवर १६५०० रोपे, राजुरा येथील १५ हेक्टर जमिनीवर १६५०० रोपे, मुंगळा येथील २५ हेक्टर जमिनीवर २७५०० रोपे, रेगाव येथील २५ हेक्टर जमिनीवर २७५०० रोपे, काळाकामठा येथील १० हेक्टर जमिनीवर ११०० रोपे,  मेडशी येथील १० हेक्टर जमिनीवर ११०० रोपे असे १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे व  सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी सानप यांनी सांगितले.

Web Title: planting of 100 hectare land in Malegaon forest area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.