आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:43 PM2019-07-15T15:43:30+5:302019-07-15T15:43:36+5:30

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.

Plantation Mother's Bone Conservation | आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: हिंदू धर्मातील संस्कारानुसार एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंंस्कार उरकून मृत व्यक्तीच्या अस्थींचे नदीपात्रात विर्सजन केले जाते. या परंपरेला रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.
रिसोड तालुक्यातील मांडवा गावातील माजी ग्रामपंचायत सदस्या गुंफाबाई माधवराव गरकळ यांचे बुधवार १० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६० वर्षीय गुंफाबाई या बुधवारी पहाटेपासून पंढरपुर यात्रेत जाण्याच्या लगबगीत गुंतल्या होत्या.
तथापि, त्यांची नेमाने पंढरपूरला जाण्याची इच्छा अपूर्णच राहिली आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गुंफाबाई गरकळ यांच्या अचानक निधनामुळे त्यांची शालिकराम गरकळ व बद्री गरकळ ही दोन मुले दुखी झाली. तथापि, या दोघा भावांनी आईच्या स्मृती चिरंतर टिकाव्या आणि एक आदर्श संदेश समाजाला मिळावा म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.सुरेश गरकळ व सरपंच विजय चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर स्वत:च्या शेतात खड्डे खोदले आणि आईच्या अस्थी खड्ड्यात टाकत त्यावर बेल, आंबा, निंब, जांभुळ व पेरु या पाच वृक्षांची लागवड केली. गरकळ कुटुंबाच्या या उपक्रमामुळे समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला असून, अंधश्रध्देलाही आळा बसण्याचा पायंडा पडला आहे.


जलसंवर्धनाचाही समाजाला संदेश
गुंफाबाई यांच्या शालिकराम गरकळ व बद्री गरकळ या दोन मुलांनी आईच्या अस्थीवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच जलसंवर्धनाचाही अभिनव संदेश या माध्यमातून दिला आहे. हिंदू संस्कृतीत मृत व्यक्तीच्या अस्थींचे जलविसर्जन होत नाही, तोवर मृतात्म्याला शांती मिळत नाही, असा समज आहे. तथापि, यामुळे जलस्त्रोताील पाणी दुषित होते, ही बाब लक्षात घेतली जात नाही. शालिकराम व बद्री गरकळ या भावांनी मात्र आईच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता या गैरसमजालाही तिलांजली दिली.

Web Title: Plantation Mother's Bone Conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.