पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:34 PM2018-05-26T14:34:24+5:302018-05-26T14:34:24+5:30

मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन देवून पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीचा निषेध नोंदविण्यात आला. 

Petrol price hike ; congress protest against government | पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन  

पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन  

Next
ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल सारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव तसेच शेतकºयांच्या बाबतीत हे सरकार कर्दनकाळ ठरले आहे. भाजपा सरकार हे गरिबी हटाव नसून गरिबांना हटविणारे आहे. मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या  वतीने सरकारचा निषेध करीत आहो, असा उल्लेख निवेदनात केला आहे.


मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन देवून पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीचा निषेध नोंदविण्यात आला. 
निवेदनात नमूद आहे, की केंद्र व राज्यात भाजपा सरकार सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली. भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण पणे पोकळ ठरली असून देशात पेट्रोल-डिझेल सारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव तसेच शेतकºयांच्या बाबतीत हे सरकार कर्दनकाळ ठरले आहे. भाजपा सरकार हे गरिबी हटाव नसून गरिबांना हटविणारे आहे. देशात वाढणारी अल्पसंख्यांक जातीविषयी सरकारचा दुजाभाव हा स्पष्टपणे दिसून येतो. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या  वतीने सरकारचा निषेध करीत आहो, असा उल्लेख निवेदनात केला आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष जगदीश बळी, विश्वम्भर नवघरे, किसनराव घुगे, उत्तमराव नाईक, गुलाब भाई , नंदू अनसिंगकर, भारत गुडदे, संतोष पाटील, शशिकांत टनमने, सैय्यद तसलीम उपस्थित होते.

Web Title: Petrol price hike ; congress protest against government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.