लोककलेच्या माध्यमातून ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ जन-जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:44 PM2018-06-13T15:44:32+5:302018-06-13T15:45:42+5:30

बुलडाणा : महाराष्ट्र  शासन (कृषी विभाग) आत्मा प्रकल्प संचालक तथा कृषी अधिक्षक बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ २०१८ जन जागृती पंधरवाडा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये पार पडला.

People's awareness of 'Advanced Agriculture-rich Farmers' | लोककलेच्या माध्यमातून ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ जन-जागृती

लोककलेच्या माध्यमातून ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ जन-जागृती

Next
ठळक मुद्दे कृषी खात्याच्या योजनेची माहिती शाहीर गणेश कदम यांनी शेतकरी वर्गाना पटवून सांगितली. चिखली तालुक्यात मकरध्वज खंडाळा या गावी उन्नत शेतकरी या कार्यक्रमाचा समारोप झाला.

बुलडाणा : महाराष्ट्र  शासन (कृषी विभाग) आत्मा प्रकल्प संचालक तथा कृषी अधिक्षक बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ २०१८ जन जागृती पंधरवाडा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमामध्ये दुधा येथील लोककलावंत शाहीर गणेश कदम आणि संच यांनी बुलडाणा तालुक्यात उमाळा, पांगरी, ढालसावंगी, रूईखेड टेकाळे, दहिद बु. आणि चिखली तालुक्यात मकरध्वज खंडाळा अशा सहा ठिकाणी लोककलेच्या माध्यमातून उन्नत शेती संदर्भात बिज प्रक्रिया माती परिक्षण, काम गंध सापळे, वृक्ष संवर्धन, सुक्ष्म मुलद्रव्याचा वापर, विहिर पुनर्भरण, शेततळे आणि इतर साºया कृषी खात्याच्या योजनेची माहिती शाहीर गणेश कदम यांनी शेतकरी वर्गाना पटवून सांगितली. संपुर्ण काय्रक्रमाला कृषी सहाय्यक अनिल सोनुने, शेळके, इंगळे, धाड कृषी मंडळ अधिकारी जाधव यांचे सहकार्य लाभले. चिखली तालुक्यात मकरध्वज खंडाळा या गावी उन्नत शेतकरी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाला (कृषी विभाग पुणे) उदय देशमुख, ढगे, कृषी अधिकारी चिखली सुरडकर, ए. डी. राखोळ, खान यांची उपस्थिती होती. उन्नत शेती समृध्द शेतकरी या जनजागृती कार्यक्रमात शाहीर लोककलावंत गजानन जाधव, समाधान गायकवाड, रंगनाथ बावस्कर, भाऊसाहेब हिवाळे, रमेश शेलार, सुनिल दांडगे, भागवत चव्हाण या कलावंतांनी भाग घेतला. सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, बचत गट, शेतमजुर वर्ग, युवा मंडळी, महिला मंडळी या सर्वांचा प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

Web Title: People's awareness of 'Advanced Agriculture-rich Farmers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.