people in washim have created logo of beti bachao | मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’ 
मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’ 


वाशिम : वाशिम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या अनोख्या उपक्रमात जिल्ह्यातील महिला, मुली जागतिक महिला दिनानिमित्त  विक्रमी संख्येने एकत्र आल्या. आज सकाळी ८ वाजता वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारण्यात आला. 

या उपक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी विश्व विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस’चा चमूने घेतली. ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन  हा लोगो तयार करण्यात आला होता. दोन दिवस उपक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली.शिक्षण विभागाने स्थानिक शाळांशी पत्रव्यवहार करून विद्यार्थिनी व शिक्षिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला महिला, मुलींचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
 

 


Web Title: people in washim have created logo of beti bachao
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.