नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील काटेपूर्णा नदीच्या पुलावरील खड्डे देताहेत अपघातास निमंत्रण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:18 PM2017-11-07T13:18:12+5:302017-11-07T13:19:07+5:30

जऊळका रेल्वे : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखादवेळी मोठा अपघात होण्याची भिती आहे.

Patch on the bridge of Katepura river give invitation to accidents | नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील काटेपूर्णा नदीच्या पुलावरील खड्डे देताहेत अपघातास निमंत्रण 

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील काटेपूर्णा नदीच्या पुलावरील खड्डे देताहेत अपघातास निमंत्रण 

Next
ठळक मुद्दे दुरुस्तीकडे दुर्लक्ष वाहनधारकांची कसरत 

जऊळका रेल्वे : नागपूर - औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने एखादवेळी मोठा अपघात होण्याची भिती आहे. पुलाची दशा वाईट झाली असतानाही बांधकाम विभागाचे मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. .

नागपूर - औरंगाबाद महामार्गावर दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर जऊळका रेल्वे येथे काटेपूर्णा नदीचे पात्र असून, या पात्रावर अनेक वर्षांपूर्वी पूल उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, पुलाचे कठडेही जीर्ण झाले आहेत. या पुलावर प्रत्येक चालक हा खड्डे चुकवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतो. अशात एखादवेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास खड्डे चुकवून वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात वाहन पुलाच्या कठड्यावर आदळून भीषण अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांत या खड्ड््यांमुळे किरकोळ अपघातही घडले आहेत. या पृष्ठभूमीवर संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील रस्ता दुरुस्त करण्यासह पुलाचे कठडेही पुन्हा बांधणे गरजेच आहे; परंतु अद्याप तरी त्याची दखल घेण्यात आली नाही.  

Web Title: Patch on the bridge of Katepura river give invitation to accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.