पालक सचिवांनी घेतला ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस‘ उपक्रमांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 06:49 PM2018-05-25T18:49:07+5:302018-05-25T18:49:07+5:30

वाशिम: जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस’ उपक्रमाचा आढावा जिल्ह्याचे पालक सचिव नंदकुमार यांनी शुक्रवारी घेतला.

Parents secretary reviewed the 'Transportforming Aspirational Districts' ventures | पालक सचिवांनी घेतला ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस‘ उपक्रमांचा आढावा

पालक सचिवांनी घेतला ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस‘ उपक्रमांचा आढावा

Next
ठळक मुद्देत कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या विकासाला विशेष प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येणाºया योजना, उपक्रमांच्या नियोजनाचा आढावाही पालक सचिव नंद कुमार यांनी यावेळी घेतला.


वाशिम: जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस’ उपक्रमाचा आढावा जिल्ह्याचे पालनक सचिव ाथा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शुक्रवारी घेतला. या  उपक्रमांतर्गत कृषी, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या विकासाला विशेष प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस’ विषयीच्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, सुदाम इस्कापे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, तानाजी नरळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नंद कुमार म्हणाले, जिल्ह्यामध्ये कृषीक्षेत्राच्या विकासाठी सिंचन सुविधा निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. याकरिता शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासोबतच लोकसहभागातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक शेतकºयाने आपल्या शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये जिरविण्याचा प्रयत्न करावा. तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर वाढविण्यासाठी सुध्दा शेतकºयांना प्रोत्साहित करावे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करावे. कुपोषण टाळण्यासाठी गरोदर महिलांची नियमित तपासणी, बालकांची तपासणी व आवश्यक उपाययोजना नियमित करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकाही बालकाचे कुपोषण होणार नाही, यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, असे  नंद कुमार यांनी यावेळी सांगितले. शिक्षण क्षेत्रात सुधारणांसाठी प्रयत्न करताना सर्वप्रथम प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना होणारी विद्यार्थी गळती रोखण्यावर भर द्या. तसेच प्राथमिक शाळेत विद्यार्थांना दजेर्दार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करा, असेही  नंद कुमार यांनी यावेळी सांगितले. ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अ‍ॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस’अंतर्गत विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येणाºया योजना, उपक्रमांच्या नियोजनाचा आढावाही पालक सचिव नंद कुमार यांनी यावेळी घेतला. तसेच त्याअनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित निदेर्शांकानुसार सद्यस्थिती व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजना याविषयी सादरीकरण केले.

Web Title: Parents secretary reviewed the 'Transportforming Aspirational Districts' ventures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.