वाशिममध्ये २१ फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 08:42 PM2018-01-21T20:42:03+5:302018-01-21T20:49:29+5:30

वाशिम: शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २६ फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Organizing an Agricultural Festival from 21 February in Washim! | वाशिममध्ये २१ फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन!

वाशिममध्ये २१ फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन!

Next
ठळक मुद्दे‘आत्मा’ यंत्रणेचा पुढाकारशेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरातील जिल्हा क्रीडा संकुलावर २१ ते २६ फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने होत असलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषि महोत्सवाअंतर्गत शासनाचे शेती व शेतीपुरक व्यवसायाशी निगडीत सर्व विभाग  सहभागी होणार आहेत. शेतकरी, उत्पादक कंपनी, सेंद्रीय शेतीगट, शेतकरी बचत गट, शेतकरी महिला बचत गटांनी या महोत्सवात आपला माल विक्रीकरिता आणल्यास त्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. विविध स्वरूपातील कृषी निविष्ठा व औजार यंत्र कंपन्या देखील कृषि प्रदर्शनीत सहभागी होतील, तसेच पशुपक्षी प्रदर्शनही यावेळी होणार आहे. कृषीसंबंधीत विविध विषयांवरील प्रशिक्षण व चर्चासत्रांचेही आयोजन यानिमित्ताने केल्या जाणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या वतीने देण्यात आली. 
कृषि महोत्सवात सहभागी होणाºया शेतकºयांनी तूर, मूग, उडिद, कडधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मसाला पदार्थ, संत्रा, आंबा, पेरू, सिताफळाचे ज्यूस, भाजीपाला असे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करावे. जेणेकरून त्याची चांगली विक्री होऊन शेतकºयांना चांगली मिळकत होऊ शकते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘आत्मा’ अथवा नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Organizing an Agricultural Festival from 21 February in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.