रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 02:36 PM2019-02-25T14:36:53+5:302019-02-25T14:37:20+5:30

पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी ...

Only 24% of the water reserves in Risod | रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा 

रिसोडमधील प्रकल्पांत केवळ २४ टक्के साठा 

Next


पाणीटंचाई तीव्र: गुराढोरांचा प्रश्न गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम): तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील १८ प्रकल्पांत मिळून केवळ २४ टक्के उपयुक्त साठा उरला आहे.
रिसोड तालुक्यात गतवेळच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने कृषी उत्पादनात प्रचंड घट आली. त्यातच प्रकल्पात पुरेसा जलसंचयही झाला नाही. त्यामुळे शासनाने या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. आता तालुक्यातील १८ प्रकल्पांतील पातळी वाढते तापमान आणि उपशामुळे झपाट्याने घटत चालली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील बॅरेजेस आणि प्रकल्प मिळून १८ प्रकल्पांत केवळ ७.५० दलघमी उपयुक्त पाणीसाठा उरला असून, प्रकल्पातील साठवण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २४ टक्के आहे. यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गुराढोरांच्या पाण्याचा प्र्रश्नही गंभीर झाला आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शासनाने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. 
 
६ प्रकल्पांची पातळी शुन्य, ५ प्रकल्प कोरडे
रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ६ प्रकल्पांत शुन्य टक्के उपयुक्त साठा उरला आहे. त्यात बोरखेडी, धोडप, गौंढाळा, हराळ, करडा आणि वरुड बॅरेजचा समावेश असून, गणेशपूर, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा आणि जवळा हे ५ प्रकल्प कोरडे पडले आहेत.  त्यामुळे या गावांतील भुजलपातळीत मोठी घट येऊन विहिरी, कूपनलिकाही कोरड्या पडत आहेत, तर गुराढोरांसाठी पाणी मिळेनासे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: Only 24% of the water reserves in Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.