मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पात ठणठणाट;  मासेमारी व्यवसाय अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 02:50 PM2018-05-25T14:50:56+5:302018-05-25T14:50:56+5:30

मंगरुळपीर  : तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने जवळपास सर्वच प्रकल्प उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला असुन मासेमारी व्यावसायीकांसोबतच कंत्राटदारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

no water in lakes, fishing business collapsed | मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पात ठणठणाट;  मासेमारी व्यवसाय अडचणीत!

मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पात ठणठणाट;  मासेमारी व्यवसाय अडचणीत!

googlenewsNext
ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील मासेमारी व्यवसायाकरिता अनेक मोठे प्रकल्प. कंत्राट घेतल्यानंतर हे मासेमारी व्यावसायीक कंत्राट घेतलेल्या प्रकल्पात मस्त्य बीज सोडतात. या प्रकल्पातील पाणी उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासे मृत्युमुखी पडले, त्यामुळे मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला आहे.

मंगरुळपीर  : तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने जवळपास सर्वच प्रकल्प उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला असुन मासेमारी व्यावसायीकांसोबतच कंत्राटदारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील मासेमारी व्यवसायाकरिता अनेक मोठे प्रकल्प असुन या भागातील विविध मत्स्यव्यवसाय  संस्थच्या माध्यमातुन कंत्राट घेण्यात येते. कंत्राट घेतल्यानंतर हे मासेमारी व्यावसायीक कंत्राट घेतलेल्या प्रकल्पात मस्त्य बीज सोडतात , हे मासे मोठे झाले की मासेमारी व्यावसायाच्या माध्यमातुन आपली उपजिवीका भागवितात.  दरवर्षी हा नित्यक्रमसुरु असतो, परंतु यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने तालुक्यातील मोतसावंगा प्रकल्प, सावरगाव, कवठळ, गिंभा, चांदई, मोहरी,  बेलखेड, गिर्डा, भुर, वनोजा , माळशेलु, बिटोडा, इचोरी, कोळंबी, जुनना या प्रकल्पातील पाणी उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासे मृत्युमुखी पडले, त्यामुळे मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला आहे. घेतलेल्या ठेक्याची वसुली माफ होणे अपेक्षीत होते, परंतु आधीच जमा केल्याने शक्य झाले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या मासेमारी व्यवसायावर आधारीत असलेले पूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ही बाब लक्षात घेवुन शासनाने  पुढील दोन वर्षाचा ठेका माफ करावा अशी मागणी मत्स्य व्यावसायीक संस्थेव्दारे केली जात आहे.

 

ठेका वसुली माफ करावी 

मंगरुळपीर तालुक्यातील यावर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे  पुर्णता आटल्याने मासेमारी  व्यावसाय पुर्णता अडचणीत आला आहे. त्यामुळे सर्व मासेमारी व्यावसायीकावर उपासमारीची पाळी आली आहे. ही बाब लक्षत घेवुन शासनाने पुढील दोन वर्षाचा ठेका वसुली माफ करावी.

- मधुकर चव्हाण (अध्यक्ष), उत्कर्ष मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, मंगरुळपीर 

Web Title: no water in lakes, fishing business collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.