नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदीतील आर्द्रतेची अट शिथिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 07:33 PM2017-11-24T19:33:38+5:302017-11-24T19:40:06+5:30

शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या  सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता  १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी  करण्यात येणार आहे.

Nafed center buy soya bean humidity conditions relaxed! | नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदीतील आर्द्रतेची अट शिथिल!

नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदीतील आर्द्रतेची अट शिथिल!

Next
ठळक मुद्दे१४ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करणारमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्यावतीने नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या  सोयाबीन खरेदीसाठी ओलाव्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता  १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावात कपात न करता खरेदी  करण्यात येणार आहे. पूर्वी १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच ‘फेअर  अँव्हरेज कॉलिटी’च्या कक्षेत ग्राह्य धरण्यात येत होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी  मंगळवारी विविध विषयावर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये १४ टक्के  आर्द्रता असलेले सोयाबीन हमीभावानुसार खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.  याबाबत निर्णय झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार  आहे.  
राज्यात यंदा अपुर्‍या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. शेतकरी  काढलेले सोयाबीन विकण्यासाठी बाजारात आणत असताना व्यापार्‍यांकडून  शासनाकडून निर्धारित ३0५0 पेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी सुरू  असल्याने लोकप्रतिनिधी आणि शेतकर्‍यांत रोषाचे वातावरण निर्माण झाले हो ते. त्यामुळे शासनाने नाफेडमार्फत राज्यात नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी  सुरू केली; परंतु या ठिकाणी ‘फेअर अँव्हरेज क्वॉलिटी’ अर्थात चांगल्या  दर्जाचा मालच मोजला जात असल्याने शेतकरी अडचणीत आले. नाफेडच्या  सोयाबीन खरेदीसाठी जास्तीत जास्त १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच  हमीभावाने खरेदी करण्यात येत असल्याने शेकडो शेतकर्‍यांना नोंदणी करून  आपला माल परत न्यावे लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घे तली. यामध्ये कृषी विभागाचे सचिव, महसूल आयुक्त, कृषी आयुक्त,  जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचा  समावेश होता. या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाफेडच्या  खरेदीचा आढावा घेतला आणि सोयाबीन खरेदी करताना आर्द्रतेची अट शि िथल करून १२ टक्क्यांऐवजी १४ टक्के करण्याचे संकेत दिले. तथापि,  यासंदर्भात पणन महामंडळ प्रशासनाला लेखी आदेशच प्राप्त झाले नसल्याने  अद्यापही १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच नाफेडच्या केंद्रावर खरेदी  करण्यात येत आहे. 


शासनाकडून नाफेडच्या खरेदीसाठी १२ टक्क्यांऐवजी १४ टक्के आद्र्र ता असलेले सोयाबीन मोजून घेण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे; परंतु  अद्याप आम्हाला यासंदर्भात लेखी आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे आम्ही  १२ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीनच खरेदी करीत आहोत. लेखी आदेश  प्राप्त होताच १४ टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी करण्यात येईल.
-गजानन मगरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी  अकोला-वाशिम.

Web Title: Nafed center buy soya bean humidity conditions relaxed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.