रविवारी १४ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 03:36 PM2019-03-20T15:36:16+5:302019-03-20T15:36:21+5:30

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित गट-ब) पूर्व परीक्षा- २०१९  रविवार, २४ मार्च २०१९ रोजी वाशिम शहरातील १४ उपकेंद्रांवर घेतली जाणार आहे.

MPSC exam on 14 sub-centers on sunday | रविवारी १४ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !

रविवारी १४ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित गट-ब) पूर्व परीक्षा- २०१९  रविवार, २४ मार्च २०१९ रोजी वाशिम शहरातील १४ उपकेंद्रांवर घेतली जाणार आहे. या  सर्व परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. शहराती सर्व १४ परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर १०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपक, इंटरनेट इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्यूटर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर एकाचवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: MPSC exam on 14 sub-centers on sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.