काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना लागला वन्यजीवप्रेमींंचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:48 PM2019-05-25T17:48:28+5:302019-05-25T17:50:15+5:30

आता काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना या वन्यजीव प्रेमींचा लळाच लागल्याचे दिसत आहे.

Monkeys in katepurna wildlife sanctury familiar to wildlife activists | काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना लागला वन्यजीवप्रेमींंचा लळा

काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना लागला वन्यजीवप्रेमींंचा लळा

Next
ठळक मुद्देवाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा संकल्पच केला आहे.ही मंडळी रोज माकडांसाठी या ठिकाणी खाद्यपदार्थ व पाणी आणतात.वन्यजीव प्रेमी युवक आले की माकडे अगदी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी खेळतात.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वन्यजीवांचे रक्षण आणि संवर्धनासाठी वाहून घेतलेल्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या सदस्य सतत राबवित असलेल्या उपक्रमांमुळे वन्यजिवांना मोठा आधार झाला असून, आता काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना या वन्यजीव प्रेमींचा लळाच लागल्याचे दिसत आहे. संघटनेच्या वनोजा शाखेचे सदस्य रोज माकडांना अन्नपाणी पुरवित असल्याने माकडे अगदी त्यांच्यासोबत खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा संकल्पच केला आहे. यासाठी मानोरा तालुक्यातील कोलार आणि मंगरुळपीर तालुक्यातील कोलार येथे संघटनेच्या शाखाही सुरू केल्या आहेत. ही सर्व मंडळी वन्यजीवांसाठी सतत झटत आहे. सापांना जीवदान देणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, अपघातातील जखमी वन्यजीवांवर उपचार करणे, वन्यजिवांच्या अन्नपाण्यासाठी उपाय योजना करणे आदि कार्य ते करीत आहेत. याच अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून त्यांनी वनोजा-पूरनजिक काटेपूर्णा जंगलात माकडांना दररोज अन्नपाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बिस्किटे, केळी, पोळ्या, विविध फळे ते माकडांना खायला देतात, तसेच त्यांची तहानही भागवितात. वनोजा शाखेचे सदस्य सतिष राठोड, सौरव इंगोले, आदित्य इंगोले, वैभव गावंडे व रितेश इंगोले. ही मंडळी रोज माकडांसाठी या ठिकाणी खाद्यपदार्थ व पाणी आणतात. माकडेही त्यांची प्रतिक्षा करीत बसलेले दिसतात. वन्यजीव प्रेमी युवक आले की माकडे अगदी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी खेळतात. त्यांनी दिलेले खाद्य हाता घेऊन खातात आणि पाणीही पितात. वन्यजीव सदस्यांच्या प्रेमामुळे मानवाप्रती असलेली भिती माकडांना आता वाटत नसल्याचे दिसते. वन्यजीवपे्रमींचा त्यांना लळा लागला असून, दिवसभर माकडे वन्यजीवप्रेमीसोबत खेळत असतात. 
 
लोकसहभागातून केलेल्या पाणवठ्यांचा आधार 
वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यात लोकसहभागातून पाणवठे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यातील काही पाणवठे पूर्ण झाले असून, या पाणवठ्यावर अनेक वन्यप्राणी आपली तहान भागवित आहेत. या पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांची लोकवस्तीकडील धाव आता कमी होणार असल्याने मानव-वन्यजीव संघर्षावरही आता नियंत्रण मिळणार आहे.

Web Title: Monkeys in katepurna wildlife sanctury familiar to wildlife activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.