भारनियमनाविरोधात आमदाराची महावितरणच्या कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 03:20 PM2018-10-15T15:20:53+5:302018-10-15T15:21:11+5:30

आमदार अमित झनक यांनी १५ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियतां कार्यालयावर धडक देत १५ दिवसांत विद्युतविषयक समस्या निकाली काढाव्या अन्यथा तिव्र आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

mla amit zanak warn msedcl to take back loadshading | भारनियमनाविरोधात आमदाराची महावितरणच्या कार्यालयावर धडक

भारनियमनाविरोधात आमदाराची महावितरणच्या कार्यालयावर धडक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महावितरणच्यावतीने भारनियमन घेतले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याविरोधात आवाज उठवित आमदार अमित झनक यांनी १५ आॅक्टोबर रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियतां कार्यालयावर धडक देत १५ दिवसांत विद्युतविषयक समस्या निकाली काढाव्या अन्यथा तिव्र आंदोलन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
सध्या जिल्ह्यात विजेच्या तुटीचे कारण समोर करून काही फिडरवरून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. विद्युतविषयक समस्यांचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी आमदार झनक यांच्याकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शेतकरी, काँग्रेस, युवक काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह झनक यांनी सोमवारी महावितरणचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी रिसोड, मालेगाव तालुक्यात विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यानंतर विद्युत रोहित्र बदलून देण्यास विलंब होत आहे, काही गावांत तर लाईनमनच नाही, जळालेले विद्युत रोहित्र बदलून देण्यापूर्वी पैशाची मागणी केली जाते आदी समस्या शेतकºयांनी मांडल्या. वाघी येथे दोन वर्षांपासून लाईनमन नाही, खंडाळा वीज उपकेंद्र येथील ट्रान्सफॉर्मर कामरगाव येथे हलविणे यावरून शेतकºयांनी आक्रमक रुप धारण केले होते. रिसोड व मालेगाव तालुक्यातील शेतकºयांच्या विद्युतविषयक समस्या लक्षात घेता १५ दिवसांच्या आत निपटारा करावा, अशा सूचना आमदार झनक यांनी बेथारिया यांना केल्या. विद्युतविषयक समस्यांचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन बेथारिया यांनी दिले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे, जि.प. सभापती सुधीर गोळे, पं.स. सभापती गजानन भोने, गजानन गोटे, सोनुबाबा सरनाईक, मोहन इंगोले, सलीम गवळी, गणेश भालेराव, गजानन इरतकर भगवानराव शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी, कांँग्रेस पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

Web Title: mla amit zanak warn msedcl to take back loadshading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.